Jump to content

टॉम आणि जेरी (मराठी नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॉम अॅन्ड जेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

टाॅम आणि जेरी हे एक दोन अंकी मराठी नाटक आहे. निखिल रत्‍नपारखी हे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असून नाटकात स्वतः निखिल रत्त्‍नपारखींव्यतिरिक्त, कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका आहे. मिलिंद जोशी यांनी नाटकाला संगीत दिले आहे.

‘टॉम आणि जेरी’. नावावरून नाटकाचे कथानक काय असेल याची अजिबात कल्पना न येऊ देणारे हे नाटक एकमेकांपासून दूर राहाणाऱ्या पती-पत्‍नींवर आहे. निखिल रत्‍नपारखींनी या नाटकात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी कमाल केली आहे. दोन वेगवेगळ्या देशांत राहणारे पती-पत्‍नी अनेक वर्षे एकमेकांशी मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधत आहेत; एरवी त्यांच्यातला संवाद तसा संपलेलाच आहे.

आपल्या या नात्याला काही अर्थ नसेल तर ते संपवून तरी टाकावे, या उद्देशाने ते भारतात भेटतात. एकमेकांच्या मनातले जाणून घेताना मग एकमेकांशी तिरकस बोलणे, एकमेकांशी भांडणे, एकमेकांचे दोष काढणे, वगैरे सुरू होते. अखेरीस त्यांच्या लक्षात येते की, त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा अजूनही कायम असला तरी दोघांना एकत्र राहून नव्हे तर विभक्त राहूनच त्यांना आपले नाते टिकवायचे आहे.

'टाॅम आणि जेरी' नाटकाचा हा विषय आजच्या काळातील नात्यांच्या पकडापकडीचे वास्तव मांडणारा आहे. २०१२ सालच्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या या नाटकाचे काही महिन्यांतच ६७ प्रयोग झाले. नाटक प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडले.