Jump to content

टीटवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टिथवाल या पानावरून पुनर्निर्देशित)

टीटवाल, टिथवाल किंवा तिथवाल हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील छोटे गाव आहे. हे कुपवाडा जिल्ह्यात किशनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. कुपवाडापासून ८२ किमी अंतरावर असलेले हे गाव पाकिस्तान-प्रशासित काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ [] आहे. टीटवाल हे तंगधर मार्गे उर्वरित भारताशी जोडलेले आहे.

१९४७ च्या भारताच्या फाळणीपूर्वी, टीटवाल हे एक व्यापाराचे केंद्र होते. []

टीटवाल हे गाव भारतात नियंत्रण रेषेवर (एलओसी) स्थित आहे. ही रेषा भारताच्या जम्मू आणि काश्मीरला काश्मीर राज्याला पाकिस्तानने बळकावलेल्या भागांपासून वेगळे करते. १९४९ च्या भारत पाकिस्तान करारानुसार नियंत्रण रेषेच्या दोन्हीकडे ५०० यार्डच्या आत कोणत्याही बांधकामास परवानगी नाही आणि हा "नो कन्स्ट्रक्शन झोन" "नो मॅन्स लँड" मानला जातो. येथे दोन्ही देशांनी आपापल्या बाजूला भूसुरुंग पेरलेले आहेत. भारताने नियंत्रण रेषेवर ७३४ किमी लांबीची घुसखोरी प्रतिबंधक यंत्रणा तयार केली आहे. []

लोकसंख्या (२०११ जनगणना)
एकूण पुरुष स्त्री
लोकसंख्या १०३५ ५४९ ४८६
६ वर्षाखालील मुले १९३ 104 ८९
अनुसूचित जाती 0 0 0
अनुसूचित जमाती 103 ५१ 52
साक्षरता 73.75% ८९.८९% ५५.६७%
कामगार (सर्व) 235 211 २४
मुख्य कामगार (एकूण) 161 - -
किरकोळ कामगार (एकूण) ७४ ७१ 3

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "340km LoC road to put vales on tourism map | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. ^ a b On the wrong side of fence, The Caravan, 01 April 2021.