झाकिर हसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झाकीर हसन (जन्म १ फेब्रुवारी १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे, जो सिलहट विभागाकडून खेळतो. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने बांगलादेश क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

१४ डिसेंबर २०२२ रोजी, भारताच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान, त्याने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि १७ डिसेंबर रोजी त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो बांगलादेशचा चौथा खेळाडू ठरला.

साचा:Stub-बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू