ज्यो लीबरमन
Jump to navigation
Jump to search
ज्यो लीबरमन (जन्म: २४ फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व माजी सेनेटर आहे. तो १९८९ ते २०१३ दरम्यान कनेक्टिकट राज्यामधून सेनेटर होता. तो २००६ सालापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. २००० सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तो ॲल गोरचा उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार होता.