ज्याँ-बेडेल बोकासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्यॉॅं-बेडेल बोकासा (फेब्रुवारी २२, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ३, इ.स. १९९६) हा मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा व सम्राट होता.

जानेवारी १, इ.स. १९६६ रोजी बोकासा सैन्याच्या मदतीने सत्तेवर आला व त्याने स्वतःला राष्ट्राध्यक्ष करून घेतले. डिसेंबर ४, इ.स. १९७६ रोजी त्याने स्वतःला बोकासा पहिला (अथवा पहिला बोकासा) या नावाने मध्य आफ्रिकेचा सम्राट घोषित केले. सप्टेंबर २०, इ.स. १९७९ रोजी त्याची सत्तेवरून हकालपट्टी झाली.

याला सलाह एद्दिन अहमद बोकासा या नावानेही ओळखतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.