ज्ञानोदय (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १८४३ साली सुरू झाले. अमेरिकन मराठी मिशनने याची सुरवात केली. ख्रिस्ती धर्म प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरु आहे.

इतिहास[संपादन]

ज्ञानोदय हे वृतपत्र मासिक या स्वरूपात झाला.अहमदनगर येथील अमेरिकन मराठी मिशनच्या लोकांनी याची सुरवात झाली.अहमदनगर येथून याचा पहिला अंक १८४२ ला सुरु झाला.यानंतर पुढील वर्षी १८४३ मध्ये याचे पाक्षिकात रुपांतर केले गेले. यानंतर जुलै १८७३ पासून याचे रुपांतर साप्ताहिकात झाले. ज्ञानोदायचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागला.

ज्ञानोदय हे पत्र सुरु करण्यामागे नियतकालिके धर्मासंबधी वाद व ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून ज्ञानोद्याची सुरवात झाली.

संपादक मंडळ[संपादन]

  1. हेन्री व्हेलेंटाईन
  2. एबट
  3. ह्युम
  4. फेअरबँक
  5. शाहू दाजी कुकडे
  6. तुकाराम नथुजी
  7. नारायण वामन टिळक
  8. देवदत टिळक
  9. दि.शं.सावरकर
  10. मनोहर कृष्ण उजगरे
  11. डॉ.भा.पां.हिवाळे
  12. शां.ल.साळवी
  13. र.ह.केळकर
  14. सुमंत दयानंद करंदीकर

वैशिष्ट्ये[संपादन]

मराठी वृत्तपत्रात चित्रे छापणे याची सुरवात ज्ञानोदायेने केली. ज्ञानोदय वृत्तपत्राने एक विशेष उपक्रमाची सुरवात केली ती म्हणजे बालवर्गासाठी बालबोधमेवा ही विशेष पुरवणी सुरु केली.