ज्ञानेश्वर आगाशे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्ञानेश्वर चंद्रशेखर आगाशे या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्ञानेश्वर आगाशे
जन्म १७ एप्रिल १९४२ (1942-04-17)
पुणे
मृत्यू २ जानेवारी, २००९ (वय ६६)
पुणे
अपत्ये मंदार आगाशे, आशुतोष आगाशे, शीतल आगाशे


ज्ञानेश्वर आगाशे (१७ एप्रिल, १९४२ - २ जानेवारी, २००९) हे एक भारतीय उद्योजक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते कोल्हापूर स्टीलचे अध्यक्ष तसेच सुवर्ण सहकारी बँकेचे आणि मंदार प्रिंटिंग प्रेसचे संस्थापक होते. आगाशे १९९५ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होते. १९६९ साली ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य झाले आणि १९८९ मध्ये ते संघाचे कार्यकारी अध्यक्ष बनले.[१]

यष्टीरक्षक-फलंदाज असलेले आगाशे १९६२ आणि १९६८ दरम्यान महाराष्ट्रासाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले. त्यांनी १३ सामन्यांत दोन अर्धशतके काढली. यष्टिरक्षक म्हणून त्यांनी दहा झेल घेतले आणि दोन स्टम्पिंग केले.[२]

यांचा मुलगा आशुतोष आगाशेही प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला.

आगाशे आणि त्यांचे कुटुंब सुवर्ण सहकारी बँकेतील घोटाळ्यामध्ये गोत्यात आले. यासंबंधी न्यायालयीन कोठडीत असताना, मधुमेहातून झालेल्या गुंतागुंतीमुळे आगाशे यांचा मृत्यू झाला.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ranade, Sadashiv (1974). Agashe Kula-vr̥ttānta. p. 375.
  2. ^ Putra viśvastācā : gaurava grantha : Jñāneśvara Āgāśe. Pune: Jñāneśvara Āgāśe Gaurava Samitī. 2002. ISBN 9781532345944
  3. ^ Kelkar, Siddhart (2009). "Friends recall royal Agashe, despite taint"Indian Express. Retrieved 2016-08-17.