Jump to content

ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात १८४९ मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र १०३ वर्षे चालले आणि शेवटी १९५१ साली बंद पडले. नामदार गोखले यांचे नेतृत्व यास लाभले होते. [] १५ ऑगस्ट १९०४ पासून हे नियतकालिक दैनिक झाले; हे मराठी भाषेतील पहिलं दैनिक आहे.

इतिहास

[संपादन]

ज्ञानप्रकाशन वृत्तपत्र सुरू करण्यामागे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांना प्रभाकरचे भाऊ महाजन यांची प्रेरणा लाभली होती. याबरोबरच केशव शिवराम भवाळकर, कृष्ण्शास्त्री चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख, केरो लक्ष्मण छत्रे, महादेवशास्त्री कोल्हटकर, मोरो रघुनाथ ढमढेरे, सदर अमीन यांचा सहभाग लाभला.

आधी हे नियतकालिक द्विसाप्ताहिक होते. वासुदेव गोविंद आपटे हे त्यामध्ये रुजू झाल्यावर त्याचे दैनिकामध्ये रुपांतर करण्यात आले. त्याकाळी केसरी या नियतकालिकाचा खूप बोलबाला होता. तेव्हा ज्ञानप्रकाश हे दैनिक प्रकाशित करणे हे एक प्रकारचे आव्हान होते. ते आपटे यांनी यशस्वीपणे पेलले. देशामधल्या उत्तम वर्तमानपत्रातील उतारे, उद्बोधक लेख आणि ताज्या बातम्या देऊन त्यांनी ज्ञानप्रकाशचा कायापालट केला.[] लॉर्ड कर्झन यावर जहाल टीका केल्यामुळे, गोखले यांनी आपटे यांना जरा जपून लिहावे असा संदेश दिला. पुढे प्रकृति-अस्वास्थ्यामुळे आपटे यांनी राजीनामा दिला.[]

संपादक मंडळ

[संपादन]
  • कृष्णाजी त्रिंबक रानडे
  • वामनराव रानडे
  • महादेव रानडे
  • कृष्णाजी लिमये
  • बा.मा.आंबेकर
  • शंकरराव गोखले

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्ती प्रकाशन वर्ष १९५२