Jump to content

ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्ञानप्रकाश (वृतपत्र) या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात १८४९ मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र १०३ वर्षे चालले आणि शेवटी १९५१ साली बंद पडले.15 ऑगस्ट 1904 पासून दैनिक झाले;हे मराठी भाषेतील पाहिलं दैनिक

इतिहास

[संपादन]

ज्ञानप्रकाशन वृत्तपत्र सुरू करण्यामागे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांना प्रभाकरचे भाऊ महाजन यांची कल्पना कारणीभूत होती. याबरोबरच केशव शिवराम भवाळकर, कृष्ण्शास्त्री चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख, केरो लक्ष्मण छत्रे, महादेवशास्त्री कोल्हटकर, मोरो रघुनाथ ढमढेरे, सदर अमीन यांच्या सहभागातून यांचीही मदत झाली.

संपादक मंडळ

[संपादन]
  1. कृष्णाजी त्रिंबक रानडे
  2. वामनराव रानडे
  3. महादेव रानडे
  4. कृष्णाजी लिमये
  5. बा.मा.आंबेकर
  6. शंकरराव गोखले