जोडाक्षरे
जोडाक्षर ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात.
- देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार
- ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.
संयुक्त व्यंजन
[संपादन]- स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत. दोन स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. उदा॰ अ+इ=ए, अ+उ=ओ ; पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य्, ब्+द्=ब्द्. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास द्वित्त असे म्हणतात. जसे क्क्, च्च्, त्त्, प्प् या संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते. उदा॰ ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही.
जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती
[संपादन]१) एका पुढे एक वर्ण लिहून:
[संपादन]- ब्+द्= ब्द्, क्क्, ब्ब्, म्म्, क्ट्, फ्ट् यांस आडवी जोडणी म्हणतात
२) एका खाली एक लिहून:
[संपादन]- ट्ट, ठ्ठ, ट्र, ङ्म, ङ्ग, न्न, द्द, क्त, द्व, द्ध, र्व यांस उभी जोडणी म्हणतात. जोडाक्षरे शक्यतो उभ्या जोडणीने लिहावीत असा संकेत आहे. परंतु टंकलेखनातील मर्यादांमुळे जेथे उभी जोडणी शक्य नसते तेथेच आडवी जोडणी चालते.
३)वैकल्पिक जोडाक्षरे
[संपादन]सर्वच जोडाक्षरे आडव्या व उभ्या अशा दोन किंवा अधिक पद्धतीने लिहिता येतात. जसे की, क्त, क्त; प्र, प्र; क्ष, क्ष; श्र, श्र; श्व, श्व; श्ल, श्ल; श्न, श्न; ............. [ चित्र हवे ]
विशेषाक्षर
[संपादन]मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे. उदा० क्ष, ज्ञ, त्र श्र, क्त वगैरे. ह्यांपैकी क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत.
क्रम
[संपादन]जोडाक्षरे लिहताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. उदा॰ स्पोर्ट्स (स्पोर्स्ट नाही). जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी (किंवा पायमोडकी) लिहावयाची असतात.
ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ) असतो.
[संपादन]ज्या अक्षरांत उभी रेघ असते (उदा॰ त, ग, व, ण, श) त्या अक्षरांची अर्धी व्यंजने लिहिताना अक्षरातील स्वरदंड (उभी रेघ) गाळतात, व पुढील अक्षर जोडतात. उदा॰ त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या
स्वरदंड नाही
[संपादन]ज्या अक्षरात उभी रेघ नाही त्या व्यंजनापासून जोडाक्षर तयार करतांना, त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या ऐवजी त्या व्यंजनाला पाय मोडून (हलंत) लिहितात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा. ड्प ट्क ठ्स ढ्म. हे पाय मोडणे केवळ टंकमुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे (आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी) असे करावे लागते, हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोडाक्षर लिहिता येते.
- किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात. (उदा॰ ड+या=ड्या)
र् या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत
[संपादन]‘र’फार प्रकार १
[संपादन]उभी रेघ असलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदा॰ भ्रम, ग्रहण, वज्र, आम्र, प्रकार, तीव्र, सहस्र, वगैरे.
‘र’फार प्रकार २
[संपादन]उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा॰ ट्राम, ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉइंग, ड्रिल, छ्र
‘र’फार प्रकार ३
[संपादन]र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी ‘र्’ (चंद्रकोरीचे चिन्ह) वापरतात. उदा॰ वऱ्हाड, कुऱ्हाड, सुऱ्या, चऱ्हाट, भाकऱ्या, दुसऱ्या, साताऱ्याची
‘र’फार प्रकार ४
[संपादन]र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या वरती एक रेफ (रफार) काढतात. उदा॰ सर्य, पर्व, गर्व, मर्ख, दर्प
संस्कृत आणि मराठीतील फरक
[संपादन]संस्कृतात ‘ह्’ युक्त सर्व जोडाक्षरात ‘ह्’ हा प्रथम येतो. उदा॰ ब्रह्म, ब्राह्मण, चिह्न, ह्रस्व, जिह्वा, प्रह्लाद. पण मराठीत या ‘ह्’ चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. उदा॰ ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, ऱ्हस्व, जिव्हा, प्रल्हाद.
वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे
[संपादन][ चित्र हवे ]
- क् +त = क्त ऐवजी क्त
- क् + ष = क्ष ऐवजी क्ष
- ज् + ञ = ज्ञ ऐवजी ज्ञ
- द् + ग = द्ग ऐवजी द्ग
- द् + ध = द्ध ऐवजी द्ध
- द् + म = द्म ऐवजी द्म
- द् + य = द्य ऐवजी द्य
- द् + व = द्व ऐवजी द्व
- श् +च = श्च ऐवजी श्च
- श् + र = श्र ऐवजी श्र
- श् + ल = श्ल ऐवजी श्ल
- श् + व = श्व ऐवजी श्व