जोची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोची (इ.स.११८५ - इ.स.१२२७) चंगीझ खानचा प्रथम पुत्र होता. याच्या जन्माआधी चंगीझच्या बायकोचे बोर्तेचे अपहरण झाल्याने हा आपला पुत्र नसावा असा चंगीझचा ग्रह होता; परंतु आपल्या व्यवहारातून त्याने ते कधी दर्शवून दिले नाही. जोची या मंगोल शब्दाचा अर्थ 'पाहुणा' असा होतो.

जन्माला आलेली प्रत्येक संतती ही औरसच मानली जावी हा कायदा बहुधा त्याने जोचीच्या जन्मावरूनच केला असावा असे सांगितले जाते. राज्याची वाटणी करताना मात्र हा वाद पुढे आला व चुगताईखानच्या आक्षेपामुळे चंगीझ, जोचीला आपल्या राज्याचा उत्तराधिकारी नेमू शकला नाही. पुढे जोचीला अकाली मृत्यू आला.