जॉन वेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॅरियन मिचेल मॉरिसन तथा जॉन वेन (२६ मे, इ.स. १९०७:विंटरसेट, आयोवा, अमेरिका - ११ जून, इ.स. १९७९:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मता होता. याचे मूळ नाव मॅरियन रॉबर्ट मॉरिसन असून त्याला ड्यूक असे टोपणनाव होते. तीस वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला वेन अमेरिकेची ओळख असलेल्या काही चिह्नांमधील एक गणला जातो.

याचा जन्म आयोवातील विंटरसेट गावात झाला तर बालपण दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये गेले. त्याला युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये फुटबॉलसाठी शिष्यवृत्ती मिळाली होती परंतु अपघातात इजाग्रस्त झाल्यामुळे ती गेली. त्यानंतर हा लॉस एंजेलसच्या जवळच्या चित्रपट स्टुडियोंमध्ये फुटकळ कामे करीत असे. १९३०मध्ये द बिग ट्रेल या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली व तेथून त्याला अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळाले.