जैविक कीड नियंत्रण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जैविक कीड नियंत्रण संपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत :ची एक पद्धती आहे .म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे ,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजीतू ह्याच निसर्गात उपलब्ध आहेत .परोपजिवी मित्र कीडीचा आपण कीड नियंत्रणासाठी वापर करतो .

सुक्ष्म जीवजंतू :- या भूतलावर असंख्य सुक्ष्म जीवजंतू ,जीवाणू ,बुरशी ,व विषाणू .आहेत

  • सुक्ष्म जिवाणू :-jjjhj

यामध्ये पिकावरील रोगनिर्माण किडीवर परिणामकारक सुक्ष्म जिवाणूंचा समोवेश होतो .उदा. क्रिस्टल तयार करणारे बॅंसिलस थुरिन्जेंसीस हा जिवाणू लेपीडोप्टेरॅंस (पतंग वर्गीय ) कीटकाच्या नियमनाकरिता चांगलेच परिणामकारक आहे .तसेच बॅंसिलस सबस्टीलीस ह्या जीवाणूंचा उपयोग मर तसेच मूळकुजव्या रोगासाठी विविध पिकांवर उदा सोयाबीन ,वाटणा ,गहू ,कपाशी व सर्व तूणधान्ये इ .साठी केला जातो.

  • बुरशी :-

बुरशीमध्ये मेटारायझीयम ॲंनीसोप्ली ,मेटारायझीयम लेव्टोव्हीरीडी ,बव्हेरिय बॅंसीयाना ह्यांसारख्या प्रजातीचा प्रामुळ्याने वापर केला जातो .पिकांवर आढळणा-या तुडतूडे पानांवरील किटक तसेच बुंध्याला पोखरणारे किंवा काळे ढेकून ह्यांचे नियंत्रण ह्या बुरशीचा वापर करून होऊ शकते .उदा नॅंमूरीय रिटिया (Namuraea nitya) ही बुरशी हिरव्या केसाळ अळ्यांना ,बुध्याला पोकळ करणा-या किड्यांना नियंत्रीत करते. ही बुरशी सर्वत्र मुख्यत :दमट वातावरणात आढळते .ह्या बुरशी किडीच्या किंवा अळ्यांच्या शरीरात वाढून त्यांना नष्ट करतात. विषाणू :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जाऊन पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात ह्याबद्दल संपूर्ण माहिती पुढील सदरात (विषानूयुक्त कीटकनाशके ) दिलेली आहे .

  • भक्षक किटक -

भक्षक ( Predator) कीटक हा निसर्गात महत्त्वाचे कार्य करतो .कारण हे कीटक पिकांना अपायकारक असणा-या शत्रू किडीना खाऊन फस्त करतात .

संदर्भ[संपादन]

http://mydreamfarming.blogspot.in/2012/08/blog-post_5627.html Archived 2018-01-02 at the Wayback Machine.