ज्येष्ठमध
Appearance
(जेष्ठमध या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्येष्ठमध (अन्य मराठी नावे: यष्टिमधु ; शास्त्रीय नाव: Glycyrrhiza glabra, (ग्लायसीऱ्हिझा ग्लाब्रा); इंग्लिश: Liquorice / Licorice, (लिकोराइस ) ही दक्षिण युरोपात व आशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. हिच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.
औषधी गुणधर्म
[संपादन]ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.
- अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे.
- रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण,४ ग्राम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.
रस- मधूर गुण- गुरू,स्निग्ध विपाक- मधूर वीर्य- शीत
दोषकर्म- वात पित्त शामक कर्म- बल्य,चक्षुष्य,वर्ण्य,शुक्रल,केश्य,स्वर्य,व्रणहर,श्वासहर,तृष्णाहर
चित्रदीर्घा
[संपादन]-
ज्येष्ठमधाचे झाड
-
ज्येष्ठमधाच्या मुळाचा काप
-
ज्येष्ठमधाच्या मुळाचे काप
-
सालीसकट ज्येष्ठमधाचे मूळ