जॅनेट जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅनेट दामिता जो जॅक्सन (१६ मे, १९६६:गॅरी, इंडियाना, अमेरिका - ) ही एक अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री आणि नर्तिका आहे. जॅनेट जॅक्सन कुटूंबातील दहावे व सर्वात लहान मूल आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७६मध्ये केली. हीने १९७० आणि १९८० दशकाच्या सुरुवातीच्या काळात गूड टाइम्स, डिफ्रंट स्ट्रोक्स आणि फेम सारख्या दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला. १९८२ पासून तिने पॉप संगीत निर्माण करण्यास सुरुवात केली.