जून आल्मेडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुन अल्मेडा : कोरोना विषाणूचा शोध लावणारी महिला संशोधक (५ ऑक्टोबर १९३०- १ डिसेंबर २००७)

व्यक्तिगत जीवन[संपादन]

सध्या जगभरात कोरोना याचं नावाची  चर्चा सुरू आहे, त्यावर संशोधन देखील सुरू आहे, पण मुळात कोरोना  साठी कारणीभूत विषाणूचा शोध  ५० वर्षांपुर्वी डॉ. जून अल्मेडा ह्या स्कॉटलंड मधील एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरातुन त्याचे अस्तित्व शोधून काढले. घरातील परिस्थिती मुळे त्यांनी वयाच्या १६  वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. आपल्या नावाची नोंद विषाणु संशोधनात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आज कोविड १९ च्या साथीच्या आजारात पुन्हा एकदा जून यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि त्यांचे संशोधन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इलेक्ट्रॉन मेक्रोस्कोप तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.       

सुप्रसिद्ध विषाणु तज्ञ जून अल्मेडा यांचा जन्म १९३० सालि स्कॉटलंड येथील ग्लासगोव्ह शहराच्या ईशान्येकडील एका वस्तीत अत्यंत सामान्य कुटुबात झाला होता. घरातील अतिशय हलाखीच्या परिस्थतीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांनतर त्यांनी ग्लासगोव्ह शहरातील एका  लब मध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या कामात त्यांना आनंद मिळू लागल्याने त्यांनी तेच आपले कार्यक्षेत्र म्हणून निश्चित केले. येथे त्यांनी वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास करून त्यांची ओळख जगाला करून दिली तसेच त्या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर देखील  अभ्यास केला.           

शिक्षण[संपादन]

ह्या संशोधनाच्या पुढील अभ्यासासाठी नंतर त्या १९५४ मध्ये लंडन येथे गेल्या. तेथेच त्यांनी व्हेनेझुएला येथिल कलाकार एनरिक अल्मेडा यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर ते दोघे पुढे कॅनडा येथे गेले आणि तेथील टोरांटो मधील ओंटेरिया येथिल कर्करोग संस्थेत इलेक्ट्रॉन मायक्रो स्कोप तंत्रज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन १९६४ मध्ये सेंट थॉमस मेडिकल स्कूल मध्ये काम करायची संधी प्राप्त झाली.  कॅनडा हुंन परतल्यानंतर अल्मेडा यांनी ब्रिटन येथील विल्टशायर  येथील सलीसबरी भागात सर्दी व सर्दिविषयक संशोधन करणाऱ्या डॉ. डेव्हिड टायरल यांच्यासोबत काम सुरू केले. सर्दी चया काळात नाकातील द्रव्यांचे नमुने तपासून सर्दिस कारणीभूत विषाणूंचा अभ्यास असे त्यांच्या अग्यासाचे स्वरूप होते. स्वयंसेवकांनी दिलेल्या वेगवेल्या नमुनमधी विषाणूंचा अभ्यास करताना त्यामधील एक नमुना जो B-८१४ म्हणून ओळखला जातो तो एका शाळकरी विद्यार्थ्यांकडून  १९६० मध्ये मिळाला होता. सदरील नमुण्याचा अभ्यास करतांना थंडी, तापाची लक्षणे तर नेहमीसारखीच दिसून आली पण त्या साठी कारणीभुत विषाणू हा प्रयोगशाळेमध्ये नेहमीच्या पद्धतीने वाढू शकत नाही असे लक्षात आले पण जर का त्यांना पेशींवर वाढवले तर ते वाढीस लागल्याचे दिसून आले म्हणून डॉ. टायारेल यांनी सदरील विषणुंचे उत्सुकतेपोटी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप द्वारे निरीक्षण करायचे ठरवले. त्यांनी ते नमुने जुने अल्मेडा यांच्याकडे पाठवले सदरील नमुण्यांमध्ये जुने अल्मेडा यांनी इन्फ्लुअँझा सदृश विषाणु आढळून आले पण ते थोडे वेगळे होते. ह्या विषाणूंना त्यांनी हुमन कोरोना विषाणु असे नाव दिले. अश्याच प्रकारचे विषाणु त्यांना उंदरामधील  हेपाटायटीस (hepatitis) आणि चिकन मध्ये आढळून येणाऱ्या ब्राँचकायटीस सदृश वाटले. सदरील  निरीक्षणावर आधारित संशोधनावर त्यांनी त्या वेळी केलेला रिसर्च पेपर त्यावेळी स्वीकारण्यात आला नाही आणि त्यामध्ये घेतलेले फ्ल्यू विषाणूचे फोटो योग्य रीतीने घेतले गेले नाहीत असे सांगण्यात आले.           

करोना विषाणू वरील संशोधन[संपादन]

त्यानंतर १९६५ सली पुन्हा डॉ टायरल्ल ,  अल्मेडा आणि डॉ टोनी वॉटरसन यांनी सदरील विषाणूस कोरोना हे नाव देऊन तो पेपर जर्नल ऑफ जनरल विरोलो जी (virology) madhye prakashit kela. त्यानंतर अल्मेडा यांनी पोस्टग्रज्युएट स्कूल ऑफ लंडन येथे काम केले जेथे त्यांना पी. एच डी ही पदवी प्राप्त झाली. त्यांच्या कार्याच्या शेवटी त्या वेलकम संस्थेत होत्या जेथे त्यांच्या नावे कित्येक पेटंट आहेत जे विषाणू आणि त्यांच्या रचनेवर आहेत. वेलकम संस्था सोडल्यावर  त्यांनी योगा क्षिक्षक म्हणून काम केले. तसेच विषाणू विषयक सल्लागार म्हणून देखील त्या काम पाहत होत्या ज्यामध्ये एड्स साठी कारणीभूत विषाणूंचा देखील समावेश होतो. ज्याचे त्यानी फोटो स्कॅन केलेले आहेत. जून आल्मेडा यांचे वयाचा ७७ व्या वर्षी २००७ मध्याये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर १३ वर्षांनी कोरोना चां प्रादुर्भाव झाल्याने पुनः लोकांचे लक्ष त्यांच्या संशोधनाकडे वेधले गेले आणि त्याला जगभर मान्यता मिळत आहे.