जी.जी. परीख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जी. जी. परीख (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे गुजराती-भारतीय डॉक्टर व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कार्यकर्ते आहेत.

जीवन[संपादन]

परीख यांचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यावेळेस भारताची स्वातंत्र्यचळवळ जोर घेत होती. तत्कालीन अनेक सधन गुजराती कुटुंबांप्रमाणेच परीख घराण्यावरही महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. परीख यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत अनेकदा ब्रिटिशविरोधी हरताळांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना वरळी तुरुंगात कारावास भोगावा लागला. इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत ते युसुफ मेहेरअलींच्या संपर्कात आले. मेहेरअलींच्या वक्तृत्वाने आणि वैचारिक प्रभावाने ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस] पक्षांतर्गत समाजवादी गटाचे सक्रिय कार्यकर्ते बनले.

परीख पेशाने डॉक्टर आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.