जियोव्हानी साल्व्हिआती
Appearance
(जियोव्हानी साल्वियाती या पानावरून पुनर्निर्देशित)
जियोव्हानी साल्व्हिआती (२४ मार्च, १४९० - २८ ऑक्टोबर, १५५३) हे सोळाव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेचा मुत्सद्दी आणि कार्डिनल होते. [१] हे पोपचे फ्रांसमधील स्थायी राजदूत होते. सम्राट चार्ल्स पाचव्याशी वाटाघाटी आणि राजनैतिक समन्वय साधण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जियोव्हानी साल्व्हिआतीचा जन्म फिरेंझमध्ये याकोपो साल्व्हिआती आणि लुक्रेझिया दि लॉरेंझो दे मेदिची (लॉरेंझो दे मेदिचीची थोरली मुलगी) यांच्या घरी झाला. त्यांचे मामा पोप लिओ दहावा यांनी साल्व्हिआतीला कार्डिनल केले. जियोव्हानीचा भाऊ बेर्नार्दो साल्व्हिआती आणि पुतण्या अँतोन मरिया साल्व्हिआती देखील कार्डिनल झाले. जियोव्हानी फ्रांसची राणी कॅथेरीन दे मेदिचीचा चुलत भाऊ होता.
साल्व्हिआती निकोलॉ मॅकियाव्हेल्लीचा मित्र होता व त्यांचा पत्रव्यवहार होत असे.
संदर्भ
[संपादन]- ^ Miranda, Salvador. "SALVIATI, Giovanni (1490-1553)". The Cardinals of the Holy Roman Church. Florida International University. OCLC 53276621.