जितेंद्र उधमपुरी
डॉ. जितेंद्र उधमपुरी (इ.स. १९४४:उधमपूरजवळ, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे एक बहुमुखी प्रतिभेचे काश्मिरी लेखक व कवी आहेत.
उधमपुरींचे शिक्षण लहान खेड्यात झाले. गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले व डोगरी भाषेवर डॉक्टरेट केली.
कारकीर्द
[संपादन]डॉ. जितेंद्र उधमपुरी हे सुरुवातीला लष्करात नोकरीला होते. तेथे काही काळ काम केल्यानंतर ते आकाशवाणीत रुजू झाले. त्यांनी ३० वर्षे आकाशवाणीमध्ये सेवा केली व वरिष्ठ संचालक म्हणून निवृत्ती घेतली.
विविध भाषांत लेखन
[संपादन]उधमपुरी यांना डोगरी, हिंदी, उर्दू, पंजाबी, या भाषा अवगत असून या भाषांत त्यांनी ३० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्लिश, नेपाळी व चेक भाषांत अनुवाद झाले आहेत. 'The History of Dogri Literature' and 'The History of Dogra Culture' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत..
काव्यलेखन
[संपादन]जितेंद्र उधमपुरी हे आधुनिक डोगरी कवितेचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांच्या शैलीत अनेक प्रयोग केले आहेत.
डॉ. जितेंद्र उधमपुरी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- जित्तो
- दीवाने गज़ल
- डुग्गरनामा
- गीतगंगा, वगैरे
पुरस्कार
[संपादन]- डॉ. जितेंद्र उधमपुरी यांना २०१५ सालचा अडीच लाख रुपयांचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.