जातकपारिजात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]

।। श्री ।।

जातकपारिजात:

जातकपारिजात या ग्रंथात लेखक वैद्यनाथ दीक्षित यांनी ७ अध्यायांत राजयोग सांगितले आहेत. ते कसे घडतात व त्याचे परिणाम खालीलप्रमाणे दिले आहेत. –

1. गजकेसरी योग:

केन्द्रस्थिते देवगुरौ मृगाङ्काद्योगस्तदाहुर्गजकेसरीति ।
द्रष्टे सितार्येन्दुसुतै: शशाङ्के नीचास्तहीनैर्गजकेसरी स्यात् ।।

गजकेसरीजात: तेजस्वी धनधान्यवान् ।
मेधावी गुणसम्पन्नो राजप्रियकरो भवेत् ।।

१. गुरू हा चंद्राच्या केंद्री असता (१, ४, ७, १०) व
२. चंद्र हा अस्तंगत किंवा नीची नसल्यास हा योग होतो.

गजकेसरी योगावर जन्मलेला मनुष्य तेजस्वी, धनधान्यसंपन्न, बुद्धिमान, गुणवान व राजाला प्रिय असा असतो. वरील योग दोन प्रकारे होतो.

भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद यांच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग होता. उच्च चंद्राच्या केंद्रात (चतुर्थात) गुरू आहे, व गुरू, शुक्र, बुध नीच व मावळलेले नाहीत, म्हणून हा योग झाला आहे.

डाॅ. राजेंद्रप्रसाद हे बुद्धिमान, गुणवान तेजस्वी होतेच पण आपल्या देशाचे १ले राष्ट्रपतीही होते. राजीव गांधीच्या कुंडलीतही गजकेसरी योग आहे. सिंह लग्न, सिंह रास, गुरू, शुक्र लग्नात. अटल बिहारी वाजपेयी यांच्याही कुंडलीत गजकेसरी योग आहे.

2. अमलायोग:

यस्य जन्मसमये शशिलग्नात् सद्ग्रहो यदिच कर्मणि संस्थ: ।
तस्य कीर्तिमला भुवि तिष्ठेदायुषोSन्तमविनाशनसम्पत् ।।

लग्नाद्वा चन्द्रलग्नाद्वा दशमे शुभसंयुते ।
योगोSयममला नाम कीर्तिराचन्द्रतारकी ।।

राजपूज्यो महाभोगी दाता बन्धुजनप्रियः ।
परोपकारी गुणवान् अमलायोगसम्भव: ।।

ज्याच्या जन्मकाली लग्न किंवा चंद्रापासूनचे शुभग्रह दशमात असतील तर अमलायोग होतो. ह्या योगात जातकाची निष्कलंक कीर्ती अशी पृथ्वीवर राहरे. व त्याच्या संपत्तीचा त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ऱ्हास होत नाही. म्हणजेच आयुष्यभर पुरून उरते. अी व्यक्ती राजाला प्रिय असते. तो ऐश्वर्य भोगणारा, दाता, बाधवांना प्रिय, परोपकारी व गुणवान असतो.

अमला योग जयललिता यांच्या कुंडलीत आहे. कुंडलीत लग्नापासून शुक्र उच्च आहे, म्हणून अमला योग झाला आहे. शिवाय शुक्रापासून मोजल्यावर दशमात गुरू आहे. हा एक शुभयोग झाला आहे.

सातमात गुरू हंसयोग (पंचमहापुरुषांपैकी एक) यांनी राज्याचे प्रथम महिलापद भूषवून त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषाविले आहे.

अधिकार, सत्ता, संपत्ती, सर्व काही त्यांना प्राप्त झाले. माहत्मा गांधीच्या कुंडलीत ही अमला योग झाला आहे. चंद्राच्या दशमात गुरू आहे.


३. शकटयोग:

षष्ठाष्टमगतश्र्चन्द्रात्सुरराजपुरोहित: ।
केन्द्रादन्यगतो लग्नाद्योग: शकटसंज्ञित: ।।

अपि राजकुले जातो निःस्व: शकटयोगज: ।
क्लेशायासवशान्नित्यं सन्तप्तो नृपविप्रियः ।।

चंद्राच्या सहाव्या/आठव्या स्थानी गुरू असुन तो लग्नाच्या केंद्राव्यतिरिक्त इतर स्थानी असता ‘शकट’ नावाचा योग होतो.

ह्या योगात गुरू केंद्रात नसावा. हा एक अशुभ योग आहे. या योगात जन्मलेला जातक राजकुलात जन्मलेला असला तरी तो कलेशयुक्त, व खूप श्रम करणारा, क्रोधी, संतप्त असतो. राजाला अप्रिय असतो, चंद्राधियोगात चंद्राच्या ६, ७, ८ ह्या स्थानांत शुभग्रह असेल तर हा एक शुभ योग आहे. म्हणून चंद्राच्या ६ व ८ ह्या स्थानी गुरू असेल तर त्यावेळी ह्या स्थानातून शुभग्रह नसावा (चंद्राधी योग नसावा.) जर चंद्रापासुन ६/८ ह्या स्थानी गुरू नीच झाला तर अशुभ परिणाम तीव्रतेने जाणवतील.

शकटयोग जवाहरलाल नेहरू, यांचा कुंडली मध्ये लग्न व चंद्रापासून षष्ठात पापयुक्त गुरू आहे, पण स्वराशीत आहे. गुरू लग्नापासुन केंद्रात नही ‘शकट योग’ झाला आहे पण ह्या योगाचा येथे भंग झाला आहे. म्हणून शकट योगाचे वाईट फळे मिळाली नाहीत.

१. लग्नेश स्वराशीत
२. भाग्येश स्वराशीत
३. केतु उच्चराशीत / राहु सुद्धा
४. शुक्र मालव्ययोग (पंचमहापुरुषांपैकी) करीत आहे
५. गुरू षष्ठात हर्ष योग आहे.

वरीलपैकी पंचमहापुरुष मालव्ययोग भंग नाही पण अमलयोग भंग आहे. म्हणून जातकास चांगलीच फळे अनुभवयास मिळाली.


4. पर्वतयोग:

सौम्येषु केन्द्रगृहगेषु सपत्नरन्ध्रे
शुद्धेऽथवा शुभयुते यदि पर्वत: स्यात ।
लग्नान्त्यपौ यदि परस्परकेन्द्रयातौ
मित्रेक्षितौ भवति पर्वतनाम योग: ।।

१. केंद्री शुभ ग्रह आणि ६ व्या ८ व्या स्थानी शुभ ग्रह किंवा ती स्थाने ग्रह रहित किंवा कोणत्याही प्रकारे बिघडलेली नसता पर्वत संज्ञक योग होतो.
२. लग्न व द्वादश स्थान यांचे अधिपति एकमेकांच्या केंद्री असून मित्रग्रहांनी दृष्ट असतील तर पर्वत योग होतो.

जन्मकाली पर्वतयोग असेल तर भाग्यवान, विद्या व्यासंगी, विनोदी, दाता, कामी, परस्त्रीशी रममाण होणारा, तेजस्वी, यशस्वी व गावातील पुढारी होतो.

पर्वतयोग श्री राजीव गांधी, यांच्या कुंडलीमध्ये आहे. केंद्रात (प्रथमस्थानात) सर्वच शुभग्रह आहेत ६, ८ या स्थानांपैकी षष्ठात केतु आहे पण षष्ठस्थान बिघडलेले नाही.

लग्नेश रवि व द्वादशेश चंद्र हे एकमेकांच्या केंद्रात (युतीन) मित्रग्रह मुका आहे. म्हणून पर्वतयोग पूर्ण होतो. आपणास माहीतच आहे की राजीव गांधी विद्याव्यासंगी, भाग्यवान, तेजस्वी, यशस्वी, देशाचे पंतप्रधान होते.


5. काहल योग:

अन्योन्यकेन्द्रगृहगौ गुरूबन्धुनाथौ
लग्नाधिपे बलयुते यदि काहल: स्यात् ।
कर्मेश्र्वरेण सहिते तु विलोकिते वा
स्वोच्चस्वेक सुखपतौ यदि तादृश: स्यात् ।।


१. नवम व चतुर्थ या स्थानाचे स्वामी एकमेकांच्या केंद्री असून जर लग्न स्वामी बलवान असेल तर काहल योग होतो.
२. चतुर्थाधिपती उच्च/स्वगृही असुन दशमेशाने युक्त/दृष्ट असेल तर काहल योग होतो.

या योगावर जन्मणार जातक पराक्रमी, साहसी, मुर्ख, पण चतुरंग सैन्य ज्याकडे आहे असा लहानसा ग्रामाधिकारी (ईमानदार) असतो.

श्री रामकृष्ण परमहंस, यांच्या कुंडलीत काहल योग झाला आहे. चतुर्थेश व भाग्येश शुक्र द्वितीयात उच्च आहे. शिवाय लग्नेश भाग्यात उच्च आहे (बलवान). धर्म हे बलवान झाले (१,५,९) म्हणून धर्मगुरू प्रसिद्ध झाले.

अभिनेता, दिग्दर्शक निर्माता राजकुमार, यांच्या कुंडलीत चतुर्थेश शुक्र स्वराशीत दशमेश मंगलाने दृष्ट ‘काहल योग’ झाला आहे. शुक्र मालव्ययोगात, शक्ति राशयोगात, चंद्र राहु युक्ति व दशमेशची शुक्र शनीवर दृष्टी या सर्व योगांमुळे ते फिल्मसिटीत चमकले.

6. हरिहर ब्रहम् योग:

वितेशाद्धनरि: फरन्ध्रभवनप्राप्ताश्र्च सौम्यग्रहा:
कामेशात् सुखभाग्यरन्ध्रगृहगा जीवाब्जचन्द्रात्मजा: ।
देहेशाद्ददि बन्धुमानभवगा: सूर्यास्फुजिदभूमिजा:
प्रोक्तास्तत्र पुरातनैहर्रिहरब्रह्माख्ययोगा इमे ।।

निखिलनिगमविद्यापारंग: सत्यवादी
सकलसुखसमेतश्र्चरुवाक् कामशील: ।
जितरिपुकुलसङ्घ: सर्वजीवोपकारी
हरिहरविधियोगे सम्भव: पुण्यकर्मा ।।

१. द्वितीय स्थानाच्या स्वामीपासून २, १२, ०८ या स्थानी शुभग्रह असता.
२. सप्तमेशापासून ४,९,८ या स्थानी गुरू चंद्र बुध हे अनुक्रमे किंवा एकत्र असता.
३. लग्नापासून ४,१०,११ या स्थानी रवि शुक्र व मंगल असतील तर हे वरील ३ प्रकारचे हरिहर ब्रहम् नामक योग होतात.

येथे त्या नियमानुसार चतुर्थात रवि दशमात शुक्र असा अर्थ होतो. शुक्र रविपासून ३ राशींपेक्षा जास्त लांब जाऊ शकत नाहि. हल्लीच्या भूम्धय पद्धतिनुसार रविशुक्र समोरासमोर येऊ शकत नाहीत. म्हणून ह्या योगाबद्दल शंका आहे. लग्नापासून चतुर्थात जर रविशुक्र असतील तुला राशीत असता ‘स्वयंसिद्धा’ नावाचा योग होतो जो उत्तम शुभ योग आहे. म्हणून शुक्र दशमात न होता चतुर्थातच व्हायला हवा.

हरिहर ब्रह्म योगात जन्मणार जातक सर्व वेदवेदांत शास्त्र व सर्व विदया यांत पारंगत, खरे बोलणार सर्व प्रकारची सुखे भोगवारा, मधुरभाषी, कामी, अनेक शत्रूंना जिंकणारा, सर्वांना उपयोगी पडणारा व पुण्यकर्म करणारा असा होता.

श्री श्री रविशंकर यांच्या कुंडलीत लग्नेश द्वितीयेश शनीपासून अष्टमात शुभग्रह शुक्र व चंद्र आहेत म्हणून हरिहरेश्वर योग झाला. सप्तमेश चंद्राच्या अष्टमात उच्चमंगल आहे. वेदवेदांतच्या शास्त्र जाणव्यासाठी धार्मिक शास्त्र जाणव्यासाठी मंगल चांगला असावा लागतो तो ह्या कुंडलीत आहे.

विश्वातील १५४ देशांत त्यांची आर्ट आफ लिव्हिंग नामक संस्था ध्यान, प्राणायाम, योग शिकवते.

  1. ^ जातक पारिजात, व्याख्याकार वैध्यनाथ