जागृती (वृत्तपत्र)
Jump to navigation
Jump to search
जागृत हे वृत्तपत्र हे सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे होते. त्याची सुरुवात १९१७ साली सुरु झाली आणि त्याचे संपादक भगवंत बळवंत पाळेकर होते. जागृती हे पत्र बडोद्याहून प्रसिद्ध होत असे. तरी स्थानिक प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील घडमोडीवरही लक्ष ठेऊन होते.
इतिहास[संपादन]
जागरूक पत्र निघाले त्याच सुमारास सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे पण काहीसे स्वतत्र बाण्याचे असे एक मराठी साप्ताहिक गुजरातीभाषी बडोदे शहरात सुरु झाले. भगवंत बळवंत पाळेकर यांनी जागृती पत्र स्वताच्या हिमतीवर सुरु केले वा सुमारे ३२ वर्ष ते मोठ्या चिकाटीने स्वसामर्थ्यावर चालविले. जागृती पत्राचे सर्वसाधारण धोरण सत्यशोधक मताचे असली तरी त्यात एकांतिकता नसे. १९१८ च्या राजकीय सुधारणा जाहीर झाल्या त्यावेळी मराठी व इतर मागासलेल्या जातीच्या नावावर कित्येकांनी जो खेळखंडोबा चालविला होता. त्याला जागृती या पत्राने विरोध केला. जागृतीने राष्ट्रीय धोरणांचा पुरस्कार केला. पत्राच्या अशा धोरणामुळे त्यांच्याविषयी समाजात गैरसमज पसरविण्याचे प्रयत्नही झाले. त्या प्रयत्नांना १९ मार्च १९१८ च्या अंकात सडेतोड उत्तर देण्यात आली.
पहिले अंक[संपादन]
पहिला अंक गुरुवार २५ ऑक्टोबर १९१७ रोजी दुसऱ्या मुहूर्तावर प्रसिद्ध झाला. पुढे दर शनिवारी पत्र प्रसिद्ध होऊ लागले.
पहिले संपादकीय मंडळ[संपादन]
भगवंत बळवंत पाळेकर हे सुरुवातीपासून त्या पत्राचे संपादक राहिले आहे.