Jump to content

जागतिक संग्रहालय दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक संग्रहालय दिन हा एक जागतिक दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.[]

महत्व

[संपादन]

संग्रहालय ही वारसा सांभाळणारी एक रचना मानली जाते ज्या ठिकाणी संस्कृती, इतिहास,परंपरा याची माहिती देणारी विविध दालने असतात. प्रत्येक देशाची, प्रांताची परंपरा, स्थापत्य, केला अशा विविध विषयांशी संबंधित वस्तू संग्रहालयात सांभाळून ठेवली जातात. पुढील पिढ्यांसाठी हे संचित मानले जाते. त्यामुळे जगभरातील विविध विषयांशी संबंधित संग्रहालयाच्या समस्या तसेच धोरणे माहिती करून घेण्यासाठी , संग्रहालयाचे महत्व सर्वाँना समजावे यासाठी हा दिवस १८ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो.[][]

संकल्पना

[संपादन]

प्रत्येक वर्षी संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी एक संकल्पना स्वीकारली जाते. २०२४ साली शिक्षण आणि संशोधनासाठी संग्रहालय म्हणजेच Museums for education and research ही संकल्पना स्वीकारली गेली आहे.[]

स्वरूप

[संपादन]

हा दिवस साजरा करण्यासाठी विविध संग्रहालये आपापल्या संस्थेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. संग्रहालय भेट देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करतात.[] विविध व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.[]

हे ही पहा

[संपादन]

संग्रहालय

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gopal, B. Madhu (2024-05-17). "Take a peek into the past with museums in Visakhapatnam" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ a b "का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम". Hindustan Times. 2024-05-18 रोजी पाहिले.
  3. ^ Centre, UNESCO World Heritage. "UNESCO Celebrates International Museum Day with the Global Museum Community". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2024-05-18 रोजी पाहिले.
  4. ^ "International Museum Day 2024: India's finest museums to add to your must-visit list". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257.
  5. ^ "संग्रहालय दिवस पर प्रदर्शनी आज". Hindustan Live (हिंदी भाषेत). 2024-05-18 रोजी पाहिले.