जळणाच्या पॅलेट
Appearance
जळणाच्या पॅलेट हे एक प्रकारचे धूरमुक्त इंधन आहे. शेतातील काडीकचरा आणि पाला-पाचोळ्याचा भुगा करून प्रचंड गती असणाऱ्या रोलर यंत्रातून दाबून काढून हे तयार करण्यात येते. याचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असल्याने याला पॅलेट म्हणतात.
या पॅलेट धूरमुक्त आणि पंखा असण्याऱ्या चुलीमध्ये किंवा शेगडीमध्ये जळण म्हणून वापरल्या जातात. ही चूल उर्जा स्नेही असल्यामुळे कमी इंधनात ऊर्जा मिळते. या पॅलेट उर्जा कार्याक्षम असतात. साधारण १ किलो लाकूडफाट्याची उर्जा ४००ग्रॅम पॅलेट देतात.