Jump to content

जर्मिनाल पिएर डँडेलँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जर्मिनल पिएर डँडेलिन या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मिनाल पिएर डँडेलँ

जन्म१२ एप्रिल १७९४
पॅरिसजवळ, फ्रांस
मृत्यू१५ फेब्रुवारी १८४७
नागरिकत्वफ्रेंच, बेल्जियन, डच
कार्यक्षेत्रगणित, अभियांत्रिकी
ख्यातीडँडेलिन गोलक, डँडेलिन–ग्रॅफ पद्धत

जर्मिनाल पिएर डँडेलँ (/ˈdændələn/; fr; १२ एप्रिल, १७९४ - १५ फेब्रुवारी, १८४७) हे फ्रेंच गणितज्ञ, सैनिक आणि प्राध्यापक होते. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये सुद्धा काम केले.

जीवन

[संपादन]

डँडेलँ यांचा जन्म पॅरिसजवळ झाला. त्यांचे वडील फ्रेंच वडिलांकडे आणि आई बेल्जियन होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घेंट येथे झाले. त्यांनी नंतर पॅरिसच्या एकोल पॉलिटेक्निक येथे पुढील शिक्षण घेतले. ते फ्रेंच सैन्यात भरती झाले आणि नेपोलियन बोनापार्ट बरोबर मोहीमेवर असतानाजखमी झाले.

यानंतर त्यांनी लाझार कार्नो यांच्या हाताखाली फ्रांसच्या गृह मंत्रालयात काम केले. पुढे ते नेदरलँड्सचे नागरिक झाले.

काही काळाने ते बेल्जियमला गेले व तेथे खनन अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि नंतर बेल्जियन सैन्यात सामील झाले.

कार्य

[संपादन]

डँडेलिन गोलक आणि भूमितीतील डँडेलिनचे प्रमेय ही त्यांची महत्वाची संशोधने आहेत. त्यांनी बीजगणितीय समीकरणे सोडवण्यासाठीची डँडेलिन–ग्रॅफ संख्यात्मक पद्धत विकसित केली.

याशिवाय त्यांनी स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन, बीजगणित आणि संभाव्यता सिद्धांत यांवरही लेखन केले.

संदर्भ

[संपादन]
  • डिक्शनरी ऑफ सायंटिफिक बायोग्राफी मधील चरित्र (न्यू यॉर्क, १९७०१९९०).
  • द डँडेलँ-ग्राफ मेथड, अ हिस्टरी ऑफ मॅथेमॅटिक्स फ्लोरियान कॅजोरी (न्यू यॉर्क, १९३८), पृ. ३६४.
  • 'डँडेलँ, लोबाचेव्स्की ऑर ग्राफ??, अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली ६६ (१९५९), ४६४४६६.
  • जी.पी. डँडेलँ, बायोग्राफी नॅशियोनाल XIV ए. क्वेतेलेत, (ब्रुसेल्स, १८७३), ६६३६६८.
  • द डँडेलँ-ग्राफ मेथड, प्राक्सिस डेर ग्लाइचुंगेन, सी. रुंगा (बर्लिन–लाइपझिग, १९२१), १३६१५८.

बाह्य दुवे

[संपादन]