जरंडेश्वर
Appearance
जरंडेश्वर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील गाव आहे. हे गाव जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. या डोंगराचा उल्लेख रामायणात आहे. हनुमानाने प्रभू श्री लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना डोंगराचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय, असे मानण्यात येते. येथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी लाखो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी जरंडेश्वरला येतात. याची उंची समुद्रसपाटी पासून 914 मीटर समजली जाते.