जयप्रकाश झेंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन सारख्या विषयांवर वैचारिक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.

झेंडे हे मुळात व्यवसायाने अभियंता होते. त्यांच्या व्यवसायामध्ये घेतलेल्या अनेक प्रकारची प्रशिक्षणे, दिलेली व्याख्याने आणि केलेल्या अभ्यासातून झेंडे यांनी निवृत्तीनंतर पुण्यातील सकाळ या वृत्तपत्रांतून व्यवसायविषयक लेख लिहायला सुरुवात केली. कल्पक व्हा हा त्यांचा पहिला लेख सकाळच्या जॉब झेड या पुरवणीcOd/s प्रकाशित झाला. त्यांची काही पुस्तके ही या लेखांची संकलने आहेत.

झेंडे यांनी उषःप्रभा मासिकात लाख मोलाची माणसं हे नियमित सदर लिहिले.

पुस्तके[संपादन]

  • आयुष्य सुंदर करताना...
  • जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती
  • पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स
  • Managing Ideas For Profit (इंग्रजी)
  • यशोप्राप्तीसाठी प्रेरक चरित्रे
  • वेळेचे व्यवस्थापन
  • सकारात्मकतेतून उत्कृष्टतेकडे
  • सकारात्मकतेकडून यशाकडे
  • स्वप्न उद्योजकांचे
  • स्वयंप्रेरणेने मीच घडवणार माझे आयुष्य