जगतवीरसिंग द्रोण (जुलै २३,१९३९-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर लोकसभा मतदारसंघातून १९९१,१९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले. ते २०१२ ते २०१७ या काळात कानपूरचे महापौर होते.