Jump to content

चौस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सापेक्षतेचा सिद्धान्तात चौस्थान हे त्रिमितीतल्या स्थानाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे मिन्कोवस्की अवकाशातील बिंदूस "घटना" असे म्हणतात आणि ते प्रमाणित पायाधारांत चार सहनिर्देशकांच्या संचात मांडले जाते:

येथे,  = ०, १, २, ३, हे अवकाशकाल मितींना खूणते आणि c हा प्रकाशाचा वेग. ही व्याख्या सगळ्या सहनिर्देशकांना एकच एकक (लांबी) असल्याची खात्री देते.[][][] ही सहनिर्देशके एखाद्या घटनेच्या चौदिश स्थानाचे घटक आहेत. दोन घटनांना जोडणारा एक "बाण" अशी चौदिश विस्थापनाची व्याख्या केली जाते:

चौस्थानाचे स्वतःशी अदिश गुणाकार म्हणजे:[]

ज्यात मिन्कोवस्की अवकाशकालातील अचल अवकाशकाल अंतराल s आणि उचित काल τ आहे. त्याचप्रमाणे भैदिज चौस्थानाचे स्वतःशी अदिश गुणाकार:

ह्यात रेषा घटक ds आणि उचित काल वाढ dτचा अंतर्भाव आहे.

सारणीरूप

[संपादन]

सारणीरूपांत ते खालीलप्रमाणे लिहिले जाते:

येथे, ct हा काल निर्देशक (काल गुणिले प्रकाशाचा वेग) आणि त्रिमितीतील x, y, z ही सहनिर्देशके

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jean-Bernard Zuber & Claude Itzykson, Quantum Field Theory, pg 5 , ISBN 0-07-032071-3
  2. ^ चार्ल्स मिस्नर, किप थॉर्न आणि जॉन व्हीलर,Gravitation, pg 51, ISBN 0-7167-0344-0
  3. ^ जॉर्ज स्टरमन, An Introduction to Quantum Field Theory, pg 4 , ISBN 0-521-31132-2
  4. ^ Dynamics and Relativity, J.R. Forshaw, A.G. Smith, Wiley, 2009, ISBN 978-0-470-01460-8