चिंतामणी पाणिग्रही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिंतामणी पाणिग्रही (जन्म: २२ मार्च, १९२२ - २९ एप्रिल, २०००) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओरिसा राज्यातील पुरी लोकसभा मतदारसंघातून तर १९६७, १९७१, १९८० आणि १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओरिसा राज्यातील भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. ते १० जुलै ,१९८९ ते १९ मार्च, १९९३ या काळात मणिपूर राज्याचे राज्यपाल होते.