चार्ल्स रिक्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स फ्रांसिस रिक्टर (२६ एप्रिल, इ.स. १९००:ओव्हरपेक, ओहायो, अमेरिका - ३० सप्टेंबर, इ.स. १९८५:पासाडेना, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे अमेरिकन भूशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते.

त्यांनी बेनो गटेनबर्गच्या सहकार्याने तयार केलेली रिक्टर मापनपद्धत अनेक दशके भूकंपांची तीव्रता मोजण्याची अधिकृत पद्धत होती.