चर्चा:हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हार्ट्सफील्ड हा शब्द ’असा’ लिहिला तर उच्चार होतो - हाट्‌ + र्स + फील्ड. ' ् ’ या चिन्हाला हिंदी-संस्कृत आणि मराठी सोडून इतर भारतीय भाषांत ’विरामचिन्ह’ म्हणतात. याचा अर्थ असा की हे चिन्ह असलेले अक्षर वाचल्यावर किंचित विराम (यती) घेऊन पुढील अक्षर वाचावे.

Hartsfield शब्दात तसा प्रकार नाही. येथे यती आहे तो ’स’नंतर. त्यामुळे त्या शब्दाचा खरा उच्चार हार्ट्‌स + फील्ड असा आहे. अर्थात मराठी लिखाण ’हार्ट्‌सफील्ड’ असेच पाहिजे. ’स’चाही पाय मोडायला हरकत नाही, पण गरज नाही. इंग्रजी अकारान्त शब्दांतल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार नेहमीच हलन्त असतो, आणि मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार ’न्‌’आणि ’अन्‌’ हे दोन शब्द सोडले तर इतर कुठल्याही शब्दांतील शेवटच्या अक्षराचा पाय मोडायला परवानगी नाही. शेवटच्या अक्षराचा पाय न मोडताही हवा तसाच उच्चार होतो. हार्ट्‌स लिहिले की उचार नैसर्गिक रीत्या हार्ट्‌स्‌ असाच होतो. --- J (चर्चा) १३:२८, १४ मे २०१३ (IST)[reply]