Jump to content

चर्चा:शेखर मुंदडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुचालन साचे काढणे बाबत

[संपादन]

@सत्यवचन आणि IndianWestrenPhilosophy: नमस्कार, सदरील लेख पान तसेच उमेश कुदळे या दोन पानावर आपण उभयतांनी नुकतीच काही संपादने केली आहेत. मराठी विकिपीडिया हे एक मुक्त ज्ञानकोश असून येथील नियमांना अनुसरून आपण येथे हवी तितकी विधायक संपादने करू शकता, तसेच नवीन लेख निर्मिती देखील करू शकता. आपल्या सर्वांच्याच योगदानाने विकिपीडिया घडत असते. काही अडचण असल्यास निसंकोच संपर्क साधावा. परंतु लेखातील सुचालन साचे काढणे तसेच दिलेल्या सूचनांचे पालन न करणे हे अपेक्षित नाही. अपेक्षा आहे की आपण सहकार्य कराल. पुढील लेखनास शुभेच्छा.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:१९, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

सर नमस्कार , आपल्या सुचनांचे नक्की पालन केले जाईल मात्र अनेकदा माहिती योग्य व तपसलेली म्हणजे दुवे सोबत जोडले गेले असून देखील तिथे बदल , संदर्भ हवा असे अनेक रिमार्क दिले आहेत . कृपया त्याबाबत मार्गदर्शन देखील करावे . सत्यवचन (चर्चा) १४:४३, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

{{बदल}} , {{संदर्भ हवा}}, {{वर्ग}} हे व इतर साचे हे त्या लेखातील कमतरता कमी करण्यासाठी असतात. जेव्हा एखादा सदस्य हा साचा पाहतो तेव्हा तो त्या लेखात स्वतः होऊन काही बदल करतो. याच करिता हे साचे दिशा दर्शक फलकाचे काम करतात. याशिवाय या साच्यामुळे प्रचालक तसेच जाणकार सदस्यांना अशा लेखांची एक गठ्ठा यादी माहीत होते. ज्यामुळे सवडीने ते या लेखात मुद्दामहून जाऊन योग्य ते बदल करण्याचा प्रयत्न करतात. सबब हे साचे गैर नाहीत. उलट साचा जोडला असता त्यामुळे सदरील लेखात जी एका चौकटीत सूचना दिसते ती नीट वाचली असता लेखात काय बदल करावेत हे लेख निर्मात्यास लवकर कळते. काही अडचण असल्यास संपर्क साधावा. शेवटी आपण सर्व एका नावेचे सहप्रवासी आहोत.- संतोष गोरे ( 💬 ) २१:२१, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]