चर्चा:शिशुवय
मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हा लेख असल्याने लेखाचे नाव "शिशुवय" असावे असे वाटते. तसेच लेख-नावांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य प्रौढत्व आणि वार्धक्य अशी लेख-नावे असावीत असे वाटते.
यांपैकी "बाळ" (नवजात अर्भक), "बालवय", किशोरवय", "तारुण्य", "प्रौढत्व" आणि "वृद्वावस्था" असे लेख उपलब्ध आहेत. गर्भावस्थेविषयी लेख "गर्भ" या नावाने आहे आणि "गर्भावस्था" हा लेख गर्भारपणाविषयी (Pregnancy) आहे. "कुमारवय" हा लेख नाही.
सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलत आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.
याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.
--Rajendra prabhune १०:५७, २४ सप्टेंबर २०१७ (IST)
- Thanks a lot sir for discussing it. I would suggest to keep the title as शिशु only. There shall be no issue if you add lot of information about शिशुवय in it. As शिशु is the original word and शिशुवय is a time period describing that word, the original article about main word is necessary in my humble opinion.
- I am very much interested in the 'definitions' of different scientific terminologies and their translation in Marathi. Definitions are extremely important in science because if definitions are not clearly defined, there are chances of ambiguity and this can lead to big chaos. I do not know if one should define anything and everything in the world, but at least when we are dealing with science, definitions are utmost important. Thank you. -- आभिजीत १३:००, २६ सप्टेंबर २०१७ (IST)
मराठी विश्वकोशातील संदर्भ
"विकासात्मक अभ्यासाचे कालखंड : मानवी आयुष्यात होणारे बदल नेमकेपणाने अभ्यासता यावेत म्हणून मानवी आयुष्याची एकूण अकरा कालखंडात विभागणी केली जाते. जीवन जरी सलग असले, तरी अभ्यासाच्या सोयासाठी आणि काही खास वैशिष्ट्यांना धरून हे कालखंड मानले जातात :
(१) प्रसूतिपूर्व कालखंड : गर्भधारणेपासून जन्मापर्यंत. (२) अर्भकावस्था : जन्मापासून दोन आठवडे. (३) शैशवावस्था : वय दोन आठवडे ते २ वर्षे. (४) बाल्यावस्था : पूर्वकाल: वय २ ते ६ वर्षे. (५) बाल्यावस्था : उत्तरकाल: वय १० ते १० वर्षे. (६) किशोरावस्था : वय १० ते १३−१४ वर्षे. (७) कुमारावस्था : पूर्वकाल वय १३−१४ ते १८ वर्षे. (८) कुमारावस्था : उत्तरकाल : वय १८ ते २१ वर्षे. (९) तारुण्यावस्था : वय २१ ते ४० वर्षे. (१०) प्रौढावस्था : वय ४० ते ६० वर्षे. (११) वृद्धावस्था : ६० वर्षे वयानंतरचा काळ."
मराठी विश्वकोशातील वरील संदर्भांनुसार माणसाच्या वाढ-विकासातील अवस्थांची नावे मराठी विकीपेडियातील संबंधित लेखांनाही असावीत असे वाटते. त्यानुसार या लेखाचे नाव "शिशुवय" किंवा "शैशवावस्था" असावे असे वाटते. म्हणजे गोंधळ होणार नाही.
त्यानुसार "मानवी वाढ व विकास" या वर्गातील लेखांची नावे पुढीलप्रमाणे असावीत असे वाटते.
गर्भावस्था, अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था.
मराठी विश्वकोशातील पारिभाषिक शब्दांविषयी संशय नसावा आणि त्यामुळे मराठी विकीवर ते शब्द वापरण्यास हरकत नसावी असे वाटते.
--Rajendra prabhune १२:५१, २९ सप्टेंबर २०१७ (IST)