Jump to content

चर्चा:शिवाजी अढळराव पाटील

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे नजीकच्या आंबेगाव तालुक्यात,१९५६ साली श्री दत्तात्रय कोंडाजी आढळराव पाटील व सौ. चंद्रभागा दत्तात्रय आढळराव पाटील यांच्या कुटुंबात शिवाजीरावांचा जन्म झाला. एकत्र कुटुंब पद्धतीने नांदणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी गरिबीचे चटके खूप सोसले खूप लहानपणी त्यांची कष्टांशी ओळख झाली . आर्थिक ओढाताणीमुळे उदरनिर्वाहाकरिता वडिलांना मदत करण्यासाठी शिवाजीराव मुंबईला आले. स्वप्नांच्या नगरीशी त्यांची ओळख झाली ती तेंव्हाच. शिकायची ओढ,पुस्तकांचे वेड स्वस्थ बसू देत नसल्याने तशा कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षण सुरु ठेवले.. उदरनिर्वाह करण्यासाठी पेपर टाकणे,चित्रपटगृहात शिपाई पासून ते एका संस्था मध्ये साध्या शिपायासारख्या नोकऱ्याही त्यांनी केल्या... मिळालेल्या अनुभवांमधून व्यवसायाबद्दलची ओढ वाढत गेली त्याचबरोबर इंग्रजीचे महत्व जाणून त्याचा सखोल अभ्यास करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. पंखात उमेदीने लढण्याचे बळ आल्यावर १५ ऑगस्ट १९७८ साली स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय शिवाजीरावांनी घेतला आणि केवळ साडे तीन हजार रुपयांच्या भांडवलावर " Elmatronic Devices " नावाची कंपनी सुरु केली. काळाची गरज ओळखून पुढे संगणकमुळे जगाच्या कामाची पद्धतीत कसे आमुलाग्र बदल घडणार आहेत हे लक्षात घेऊन ' Dynalog ' ह्या त्यांच्या कंपनीने संगणकासाठीचे आवश्यक parts बनवण्यास सुरवात केली व ह्या कंपनीने स्थैर्य,सुबत्ता आणि नावलौकिक मिळवून दिला .

१९९४ साली 'जागतिक मराठा चेंबर्स ऑफ असोशिअशन' च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाली आणि जगातील अनेक मराठी उद्योजकांशी गाठीभेटी झाल्या , संवादाला सुरवात झाली . १९९६ साली शिवाजीरावांच्या अध्यक्षतेखाली ९२ मराठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने २५ दिवसांचा युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला,क्षितीज सगळीकडून रुंदावत गेले .

एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्थिरावल्यावर काही वेगळ्या भूमिकेंची आव्हाने खुणावायला लागली. दरम्यान हिंदुत्वाबद्दलची निष्ठा,मातृभूमीबद्दल प्रेम नी विधायक कार्य हे ध्येय उराशी बाळगून काम करणाऱ्या 'शिवसेने' शी संपर्क आला... आणि शिवसेनेतल्या २४ फेब्रुवारी २००४ साली झालेल्या प्रवेशाने,त्यांना मिळालेले अनुभव नि समाजाचे ऋण फेडायची संधी मिळाली...... एक मराठी व्यावसायिक पहिल्यांदा निवडणूक लढला आणि २०,००० मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आला. प्रतिकूल परिस्थितीत झगडत एका मराठी माणसाचा प्रवास सुरु होऊन आणि एक यशस्वी उद्योजक ते खासदार अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरु आहे

Start a discussion about शिवाजी अढळराव पाटील

Start a discussion