चर्चा:विलिस टॉवर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"आत गेल्यावर आम्हाला एका लिफ्ट ने पहिल्या मजल्यावर नेल्यात येते. तेथे तिकीट काढणे आदि सोपस्कार झाल्यावर परत आम्हाला एका लिफ्ट ने दुसऱ्या मजल्यावर नेल्यात येते. तेथे विलिस टॉवर कसा सुंदर आहे, कसा वेगळा आहे, तो किती उंच आहे अशा असंख्य गोष्टींची माहिती भिंतीवर लिहिलेली असते. तेथून पुढे गेल्यावर एका सभागृहात विलिस टॉवर ची एक फिल्म दाखवण्यात येते. अशी जाहिरात बाजी अमेरिकेत सगळीकडेच चालते. वरच्या मजल्यावर गेल्यावर प्रत्येकाचा एक फैमिली फोटो काढण्यात येतो आणि तो ग्लास बाल्कनी च्या पाठीमागे ठेऊन फोटो ची प्रिंट काढण्यात येते. आपण ग्लास बाल्कनी पाहून येई पर्यंत तो तयार असते आणि परत असताना आपल्या समोर दाखवण्यात येते. आधी आपण ग्लास बाल्कनी पाहून वेडे झालेलो असतो आणि त्यात असा फोटो पाहून अजून वेडे. हळू हळू उत्चूकता शिगेला पोहोचल्यावर आम्हाला परत एकदा एका लिफ्ट मध्ये बसवण्यात आले. आणि अक्षरश: एक मिनिटात १०३ मजल्यावर नेऊन ठेवले गेले! २६ फूट प्रती सेकंद या भन्नाट वेगाने लिस्ट आपल्याला या उंचीवर नेऊन ठेवतात. पोटात गोळा उठणे काय असते हे कळायच्या आताच आपण १३५३ फुट उंचीवर आलेले असतो. हे अंतर कापत असताना कोणत्या क्षणी आपण कोणती बिल्डिंग पार करत आहोत याची माहितीही लिस्ट मध्ये दिली जाते . आणि आपण पोहोचतो १०३ मजल्यावर.... तेथे पोहोचल्यावर लिफ्ट च्या बाहेत १०३ व मजला आपले स्वागत करतो. - आणि मग जणू "नभ आता ठेंगणे" अशी अवस्था होते. यालाच 'द स्काय डेक'आहे म्हणतात. या मजल्यावर चारी बाजूंनी शिकागो चा नजारा काचेतून पाहता येतो. आणि तेही कितीही वेळ. या मजल्यावरून आकाश स्वच्छ असेल तर ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रध्ये पाहता येतो. ४ राज्य एका ठिकाणाहून पाहता येण्यासारखे एकमेव ठिकाण म्हणजे विलिस टॉवर.... ईल्लिनोइस , इंडियाना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या प्रदेशातील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो..... - ५०-५० मजली बिल्डिंग ही एकदम पिल्लू पिल्लू पाहायला मिळतात. शिकागो शहराच्या भूगोलाचा चांगला अभ्यास येथून करता येतो. प्रत्येक दिशेला काय दिसेल याचे ताजे फोटो काढून त्याला नावे देऊन अतिशय व्यवस्थित पणे लाऊन ठेवलेले आहेत. शिकागो चे रास्ते, रेल्वेचे रूळ, नदी, बिल्डींग्स, कारंजी, बंदर अशा अनेक गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात."


Some information needs to be kept in the main article (may be by changing the style of the article.....).... Mandar Kulkanri

अतिशय व्यवस्थितपणे[संपादन]

अतिशय व्यवस्थितपणे 2409:4042:60B:DE67:456D:D3CE:C0B7:C7B0 १६:३३, २९ जानेवारी २०२२ (IST)[reply]