चर्चा:वटपौर्णिमा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240 आणि Sureshkhole: नमस्कार! या लेखातील मजकूर वगळला गेला आहे काय? मी यात एक छायाचित्र घातले होते ते ही दिसत नाही. आपण पाहून मला कळवले का? धन्यवाद.आर्या जोशी (चर्चा) १५:३२, ८ जून २०१८ (IST)[reply]

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा.


हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा होय. त्याचबरोबर पावसाळ्यातील पहिलाच येणारा सण म्हणूनही त्याची ओळख आहे.या दिवशी सर्व महिला व्रत,उपवास करतात.महिलांचा सण म्हणूनही या सणाची ओळख आहे.सावित्रीने यम देवाकडून वर मिळवून तिचा मृत पती जिवंत केला अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.सुवासिनी स्रियांसाठी या दिवशीचा उपवास खूप महत्वाचा असतो.पौर्णिमा या दिवशीच ही घटना घडली म्हणून त्या दिवसापासून स्रिया आपल्या पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे यासाठी हा उपवास करतात.सावित्रीने वडाच्या झाडाखाली तिच्या पतीची सेवा केली व यमदेवाने तिला वर मागायला सांगितला त्यावर सावित्रीने पतीला जिवंत करण्याचा वर मागितला व वडाच्या झाडाखालीच यमाने तिच्या पतीचे प्राण परत केले.म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.पर्यावरण दृष्टीने वडाचे झाड खूप उपयुक्त आहे. वडाचे खूप औषधी गुण आहेत.

वटपौर्णिमा दिवस - २४ जून २०२१

वटपौर्णिमा वटपुजन मुहूर्त - पहाटे ३:३२ वाजेपासून रात्री १२:०९ वाजेपर्यंत आहे.

वटवृक्षाप्रती कृतज्ञता - पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वटवृक्ष खूप महत्वाचा आहे.त्याचे खूप औषधी गुणधर्म आहे.खूप सुंदर व आनंद देणारा हा वृक्ष आहे.म्हणून त्याची पूजा करून त्याप्रती प्रेम व्यक्त केले जाते.ज्या महिलांसाठी हे झाड उपलब्ध नसेल त्यांनी या झाडाची प्रतिमा पाटावर ठेऊन रांगोळी,धूप, दीप, नैवेद्य,यांनी पूजा करावी.पूजेचे सर्व साहित्य वापरावे व मनोभावे प्रार्थना करावी. श्रध्दा ठेऊन केलेली कोणतीही गोष्ट फळ देते हे ध्यानात ठेवावे.

वट पूजेसाठी साहित्य - सावित्री व सत्यवान मूर्ती

धूप,दीप,अगरबत्ती

तूप

पाच फळे

सफेद धागा

पाण्यासाठी लहान कलश

हळदी कुंकू

या प्रकारचे साहित्य पूजेसाठी वापरावे.ज्या ज्या महिलांना माहित नसेल त्यांनी येथे पहावे.एखादे साहित्य नाही भेटले तरी चालेल फक्त मनात श्रध्दा असावी.

या दिवशी काय करावे?

महिलांनी या दिवशी उपवास करावा.शक्यतो फलाहार घ्यावा.

व्रताचा संकल्प सोडा म्हणजे प्रार्थना करा.

धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी सर्वांना प्रसाद वाटावा.

महिलांनी या दिवशी सावित्री व सत्यवान यांची पूजा,प्रार्थना व नावाचा जप करावा.

वडाचे पूजन करा.वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सात प्रदिक्षणा घाला.

या दिवशी मन प्रसन्न ठेवावे तोंडातून अपशब्द जाणार नाही याची काळजी घ्यावी.

या सणातून काय शिकावे?

ज्या प्रमाणे सावित्रीने तिच्या पतीचे प्राण वाचवले त्या प्रमाणे आजच्या कलियुगात या घटना घडणे शक्य नाही.परंतु सावित्रीच्या पावलावर पाऊल टाकून आजच्या महिलांनी पतीला प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी व आपला प्रपंच पुढे कसा जाईल याचा प्रयत्न करावा.घराची,देशाची सेवा करावी.

मुळात भारतीय संस्कृतीचे सण हे पर्यावरण दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.पर्यावरणातील प्रत्येक घटक हा मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय परंपरेत सण साजरे केले जातात.मुळात भारतीय परंपरा हीच पर्यावरण रक्षणासाठी आहे.