चर्चा:रक्षाबंधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय संस्कॄती उदात्तीकरणाचा किंवा प्रचारकी ढंगाचा दृष्टिकोन टाळावा[संपादन]

सध्याच्या लेखात पुढीलप्रमाणे काही वाक्ये आहेत : "म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. रक्षाबंधन म्हणे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. "

ही वाक्ये विश्वकोशीय लेखनशैलीच्या निकषांनुसार उदात्तीकरणवादी/प्रचारकी ढंगाची वाटतात. शिवाय ही टिप्पणी व्यक्तिगत मतांनुसार/विचारांनुसार पुरस्कारलेली असण्याची शक्यता दाट असावी. विद्वत्तापूर्ण आणि तलनिक अभ्यासाच्या दृष्टीने विश्वसनीय अश्या संदर्भग्रंथांतून याविषयीचे विवरण तपासून तशी माहिती नोंदवायला हवी. तूर्तास असे प्रचारकी लिखाण मुख्य लेखातून वगळावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१२, ३ सप्टेंबर २०११ (UTC)

लेख सुधारीत केला आहे.आर्या जोशी (चर्चा)