चर्चा:युनिकोड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकीपीडियावरील तथाकथित चूक[संपादन]

लेखातले एक तीनदा आलेले वाक्य अशा स्वरूपाचे आहे : >(ही चूक साक्षात wikipedia मध्ये करण्यात आली आहे ).< युनिकोडने अक्षरे टंकण्यासाठी कितीही उत्तम कोडिंग केले असले तरी संगणकाच्या फलकावर जसे अक्षर दिसते ते, (१) फ़ॉन्टवर (२) ब्राउझरवर आणि (३) संगणकावर स्थापलेल्या आज्ञावलीवर अवलंबून असते. र्‍ह, र्‍य आणि अ‍ॅ ची जी उदाहरणे दिली आहेत ती माझ्या संगणकावर वेगळीच दिसत आहेत. अ‍ॅ च्या ऐवजी पोकळ चौकोन आणि ह-य ला जोडलेले पायमोडके नुक्ताधारी र.

थोडक्यात काय, तर युनिकोड वापरून मराठीतली सर्व अक्षरे लिहिता येत नाहीत. युनिकोड फक्त देवनागरीसाठी आहे. ती पद्धत वापरून हिंदी, नेपाळी आणि संस्कृत लिहिता येते, मराठी नाही! ..J १५:११, १० मे २०११ (UTC)


नमस्कार !

तुमच्या सुचना/ तक्रारी माझ्यासाठी हास्यास्पद आहेत. मी Project AAGचा HEAD & FOUNDER आहे.

तुम्हला काही गैरसमज दूर करण्याची गरज आहे. युनिकोड वापरून मराठीतून उत्तम लिखान करता येते.

कृपया या विषयावर चर्चा करण्यासाठी " अभय नातू " यांच्या चर्चा पानावर जा . Ashish Gaikwad १५:४३, १० मे २०११ (UTC)


युनिकोडमध्ये कायकाय नाही[संपादन]

  • पायमोडका अ लिहिता येत नाही. स्वरदंड नसलेला अ लिहिता येत नाही. सावरकर लिपीतले ‍इ-ई, उ-ऊ, ए-ऐ, र, शेंडीफोड्या श, ’र’ न जोडलेला श्र, संस्कृतमधला ख, मराठीतले च, झ, ञ, पाऊण य, वगैरे वगैरे. ही मराठी अक्षरे कुठल्याही युनिकोडधारी फ़ॉन्टमध्ये नाहीत.
    • उत्तर : शेंडीफोड्या श in font Sanskrit2003 |
  • चंद्र असलेला अ टंकता येत नाही. प्रयत्‍न केला तर एक तर चौकोन उमटतो, किंवा किंवा ऍ, किंवा हलन्त चिन्ह असलेल्या वर्तुळावर तिरपी चंद्रकोर. चंद्रधारी अ हे अक्षर, च, छ, झ प्रमाणे फक्त मराठीत आहे, देवनागरीत नाही.(हिंदीत च्य, छ्य, झ्य आहेत!)
    • उत्तर : चंद्र असलेला अ in Lohit marathi font
  • युनिकोडधारी फ़ॉन्ट्‌स मध्ये जो चंद्र व्यंजनावर देता येतो तो मराठीसारखा आडवा नसून मल्याळममध्ये अतिर्‍हस्व ’उ’ला लागतो तसला वाकडा आहे.(तो मुळात मल्याळमकरताच बनवला आहे!) आणि ती चंद्रकोर सुबक बीजेच्या चंद्राप्रमाणे नसून प्रमाणभ्रष्ट asymmetric असते. तसाच ऋकार. कृ बघा, ऋकाराची वाटी कशी वाकडी आहे.
    • उत्तर :
  • क, द सारख्या अनेक अक्षरांचा स्वरदंड इतका छोटा असतो की त्याला र लावला की दिसतच नाही. ख ला तर र लावताच येत नाही, त्यामुळे ख्रिश्चन हा शब्द लिहिता येत नाही. (हिंदीत ख्रिस्त, ख्रिश्चन हे शब्द नाहीत; त्यांचे काहीच अडत नाही.)
    • उत्तर : तुम्हाला | ऱ्खिश्चन \ ख्रिश्चन \ ऱ्क क्र \ द्र ऱ्द्र ऱ्द | म्हणायचे आहे काय ?? कृपया प्रतिमा द्या .
  • जर्मन Ü, Ö, आणि दीर्घ Ö हे उच्चार मराठीत लिहून दाखविण्यासाठी अर्ध्या अ ला अनुक्रमे यू, यो आणि यॉ जोडावे लागतात. मुळात अर्धा अ काढता येत नसल्याने हे उच्चार लिहून दाखवता येत नाहीत.
    • उत्तर :
  • ग्रॅंड, ट्विटर, स्पोर्ट्स, नॉर्दॅम्प्टन हे शब्द कसे अवाचनीय दिसतात ते पहावे.
    • उत्तर : स्पोर्टस् | नॉर्देंप्टन | ट्‍विटर | ग्रॅन्ड or ग्रँड notice two different unicode ँ = गँ and ॅ + ं = गॅं |
  • उभ्या मांडणीची क्र सारखी कित्येक जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.(उभ्या मांडणीचा क्र हा त्रला क ची उजवी वाटी जोडून बनतो; कदाचित माहीत नसेल म्हणून मुद्दाम सांगितले आहे.)
    • उत्तर : this deals with font not unicode
  • स्वरावर रफार देता येत नाहीत, त्यामुळे हविर्‌अन्न, कुर्‌आन, पुनर्‌उच्चार, नैर्‌ऋत्य, पुनर्‌ऐक्य, हे शब्द अनुक्रमे अ, आ, उ, ऋ आणि ऐ वर रफार देऊन लिहिता येत नाहीत.
    • उत्तर : हविअ͑न्न | कुआ͑न | पुनउ͑च्चार | नैऋ͑त्य | पुनऐ͑क्य
  • उर्दू लिपीवर मराठीत पुस्तक लिहायचे झाले तर पाच वेगवेगळे ज, तीन स, दोन त, दोन अ, दोन ह कसे लिहून दाखवणार?
    • उत्तर : tell me also how to write Book of urdu in Hindi, English ( roman letters and not Latin ) etc
  • आणखी खूप त्रुटी आहेत, आठवल्या की सावकाशीने लिहीन.(या ’त्रु‘ तला उकार किती घाणेरडा आहे ते पाहून ठेवावे.)
    • उत्तर : this deals with font not unicode

आणि आपण म्हणता की युनिकोडमध्ये मराठी लिहिता येते! मी वर दिलेली सर्व अक्षरे आस्कीपद्धतीने टंकून त्यांची पुस्तके बनताना मी पाहिली आहेत. लिपीसुधारणांवर एखादा लेख लिहावा म्हटले, तर त्यासाठी युनिकोड पूर्णपणे कुचकामी आहे. -...J १७:५३, १० मे २०११ (UTC) उत्तरे = Ashish Gaikwad १३:४८, ११ मे २०११ (UTC)


मराठी व्यतिरिक्त इतर भाषांचे तुम्हाला चांगले ज्ञान आहे . मला तुम्ही वरील जी अक्षरे लिहता येत नाही त्यांची चित्रे काढून द्या . माझ्या ज्ञानाचा वापर करून मी ती अक्षरे युनिकोडातून लिहण्याचा प्रयत्न करतो .

सुचना : जर तुमची ऑपरेटिंग सिस्टिम windows XP असेल तर ती युनिकोड आवृत्ती ५.१+ मध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणे काम करणार नाही. कृपया windows 7 किंवा AAG ऑपरेटिंग सिस्टिम वापरा किंवा २००७ नंतरची कोणतीही
ऑपरेटिंग सिस्टिम वापरू शकता. ( कारण त्यां मध्ये युनिकोड आवृत्ती ५.१+ मधील प्रमाण वापरले आहे ) . . Ashish Gaikwad १२:५०, ११ मे २०११ (UTC)

On some website i found what you r saying ( अ ची बाराखडी )

क् ख् ग् वगैरे पाय मोडलेली व्यंजने आपण स्वीकारली आहेत आणि त्यांना स्वरांची जोड देऊन, त्या त्या व्यंजनांची बाराखडी तयार केली आहे. तर मग लंगडा अ् स्वीकारून अ ची बाराखडी का स्वीकारू नये , याची कारणे :

व्यंजनाला स्वर जोडला की हवे ते अक्षर मिळते. क् अधिक अ म्हणजे क, क् अधिक उ म्हणजे कु होतो. अ ची बाराखडी तयार करतांना एका स्वराला दुसरा स्वर जोडावा लागतो इतकेच. उदा. अ् अधिक एकार म्हणजे ऐ, अ् अधिक उकार म्हणजे ऊ वगैरे...म्हणजे, अ ची बाराखडी स्वीकारून महान मराठी भाषेचं काहीही बिघडत नाही आणि भलही होत नाही .

so Marathi dont need अ ची बाराखडी. hence marathi also dont need half form of अ .


Ashish Gaikwad १४:०८, ११ मे २०११ (UTC)