चर्चा:मोहटा देवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.

     श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।  वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। 
                                           या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.
     श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.
     यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। 

या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

     जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करून मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करून दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे

असा आत्मविश्वासू माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय.

     शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।।
     रोगीट शरीर व मन हे आपल्याच कर्मचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहीजे हा प्रेष माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासुन टोकतात व मनुष्यजीवंत असूनही जीवंतपणाची अनुभुती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊनजगत असताना जीवानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणीशक्ती प्राप्त होते हाच श्री मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती होय.
     अनेक भक्तगणांना दृश्य स्वरुपात साक्षात्कार येऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गवोगावी पसरु लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरुपाकडे पाहीले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहीली अनुभूती.

म्हशीचा रंग बदलला :-[संपादन]

     नित्य श्री मोहटादेवीची ना येथे जाऊन तीर्थ घ्यावे श्री भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे व श्री मोहटादेवीचे दर्शन घेऊन दिवसभर सदाचार संपन्नतेने राहुन सासंसरीक कर्म करावा असा दिनक्रम असताना प्रसंग असा की, एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा चुकारीच्या म्हशी आल्या. चुकारीच्या आलेल्या म्हशी सांभाळून ज्यांच्या असतील ते म्हशचीचे मालक आल्यावर त्यांना देऊ अशीच त्याची इच्छा ईश्वरी लीला व वेगळीच असते. अनेक दिवस वाटपाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांचे नाकेदार यांना कळाले व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि पाचारण करून बंदिस्त करण्याच आदेश केला. बिचार्या भक्तास खूप दुःख झाले दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला आई यापुढे आम्ही गायी म्हशीचे दुध तुप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहुन आई व श्री मोहटादेवीची कृपा झाली. ईश्वराजवळ कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असते. भक्तांचे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे याप्रमाणे भक्त साहसी व्हावा, बलवाण व्हावा म्हणूनच भगवान प्रसंग ऊभा करत असतो व त्याचे निवारण ही करतो. दुसर्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतुन म्हशीचा काळा रंग बदलून भोरा (पांढरट) झाला. काल पाहीलेल्या ह्या म्हशी नाहीत बंदिस्ताचा हुकुम रद्द केला. ही सर्व श्री मोहटादेवीची लीला आहे असे वर्णन सर्वांनी केले नाकेदारासह भक्तांनी श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दुध तुप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय कात नाहीत. बादशहाच्याही कानी ही वार्ता नाकेदाराकडून कळली उपासना भाग; भिन्न असल्यातरी तत्व एकच आहे. शक्ती एकच आहे. नीतिमत्ता, ही सर्व धर्माचीच शिकवण आहे आणि यातील कार्य करणारी शक्ती म्हणजेच श्री जगदंबा देवी आहे. भेदाभेद सर्व अमंगल ।। अशी बादशहाची वृत्ती पालटली व भ्रम दुर झाला नाकेदारास बढती देऊन श्री मोहटादेवीस विपूल द्रव्यदान दिले सर्वजन आनंदाने श्री मोहटादेवीची महती गाऊ लागले. ही वार्ता सर्वदूरजाऊन देवीची प्रसिद्धी होऊ लागली.

श्री. मोहटादेवीच्या न्हाणीद्वारे रोगमुक्तता :- ==

    मोठमोठे वडाचे मोहाची झाडे व त्यांची घनदाट सावली. उंच असा डोंगराच्या पायथ्याशी मोहटागाव नजीक श्री भगवानसिद्धश्वरांचे पुरातन लिंग मनोकामना सिद्ध करणारे ग्रामदैवत, जवळच एक ओढा व त्यामध्ये डोह. या ठिकाणी श्री रेणुकामाता हरी, गोपाळ, बन्सी दहीफळे आदि भक्त समुहांच्या बरोबर येऊन पहाटेच्या वेळा गावातील सुवासिनी स्त्रियांना दिसून आली तिथे श्री मोहटादेवी तिने डोहातील पाण्यामध्ये स्नान केलेले दिसून आले. म्हणून स्थळास श्री मोहटादेवी न्हाणी असे म्हणतात.
     तीर्थ म्हणून या स्थळास महत्व आहे. शरीरास होणार्या अनेक व्याधी स्नानाने बरया होऊ लागल्या तर मनाचे रोग नाहीसे होऊन तीर्थ प्राशनाने आत्मबल वाढू लागले. तेव्हापासून या ठिकाणचे पावित्र्य सांभाळून श्रद्धेने लोक तिर्थपुजा करु लागले.

== अभयं सत्व संशुद्धार ज्ञान योग व्यवस्थिती : ==

     अभय हे भक्तांचे पहीले लक्षण असुन देवांवरचा दृढ विश्वास हे खरया भक्तांचे लक्षण आहे. या नुसार अनुभाव घेतलेले एक देविभक्त सदग्रहस्थ श्री गहीनीनाथ रघुनाथ सरोदे, पाथर्डी येथील रहीवासी व माजी सैनिक. भारत पाकीस्तानने युद्ध सुरु झाले. आपण समोरच्याच भाऊ मानले तर त्यांनीही आपणास भाऊ म्हणूनच वागविले पाहीजे व वागले पाहीजे. परंतू सत्ता, पैसा ही आधिभैतिक सभ्यता व्यक्तीस संस्कृतीपासून दूर नेते व संघर्ष सुरु होतो. याप्रमाणे युद्ध सुरु झाले.

यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्री विजयो भ्रुतिर ध्रुवा नीतीर मतिर मम ।। धर्म न्याय नीतीचाच विजय असतो या प्रमाणे आई श्री मोहटा देवीमातेने भारतमातेचा विजय होऊ दे अशी प्रार्थना करून या भारतमातेचा वीर भक्ताने नवस केला. चिंतन करून झोपी गेले तो पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला. सकाळ बातमी समजली भारतास विजय मिळाला व युद्ध संपुष्टात आले. श्री मोहटादेवीची अनुभुती अनेकांना युक्त केली व महानंदाने श्री मोहटादेवीचा चांदीचा टोप भक्तांच्या सहाय्याने तयार केला. भव्य अशी मिरवणूक निघाली एवढ्यात मनात विचार आला की गंगाजलाने टोपासहे श्री मोहटादेवीस महाभिषेक करावा परंतु एवढ्या अवधीत गंगादक आणणे अशक्य मनाला खिन्न वाटले. सत्य संकल्पाचा दाता भगवान ही भक्ताची मानसिकता व शुद्ध भाव पाहुन श्री मोहटादेवी प्रसन्न झाली व गंगोदकाचा जलकुंभ घेऊन एक व्यक्ती मिरवणूक मेळाव्यात आली. जलकुंभ सरोदे यांचे हाती देऊन ती व्यक्ती गुप्त झाली. श्री मोहटादेवीचीच चमत्कृती असून संकल्पाचा साक्षात्कार दिला चांदीचा टोप अर्पण करून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी गायीसाठी नैवेद्य वाढला तरत्याठिकाणी त्याचवेळी गाय येऊन नैवेद्या सेवन केला म्हणजे गायीच्या रुपाने श्री मोहटादेवीनेच नैवेद्य सेवन केला व भक्तांना आशिर्वाद दिल ही महती कळून आली.

     आपुलीयासाठी पुजायाचा देव घेता त्याचे नाव कार्यसिद्धी ।।
     देवीच्या पुजनाने कार्याची सिद्धी होते व नवसास श्री मोहटादेवीपावते अशी किर्ती वाढू लागली व भावीक भक्तगणांमध्ये बहुसंख्य वाढ होऊ लागली.

पुजा पद्धती श्री मोहटा देवीची पुजा करण्याच्या पद्धती :- 1) 1) राजोपचार पुजा यामध्ये देवीची षोडशोपचार पुजा करून पात्रा साधनादि तंत्राने विधिवत छत्र चामर ई राजोपचार अर्पण करतात. महाभिषेक होऊन महावस्त्र अर्पण करून महानैवेद्य दाखवतात. 2) महापुजा षोडश उपचार पुजा होऊन भकत इच्छेनुसार, रुद्र, पवमान, पुरुषसुक्त, हिरण्यसुक्त आदि मंत्राने अभिषेक केला जातो. 3) लघुरुद्राभिषेक रुद्राची 121 आवर्तनाचा महाभिषेक पुजन, महावस्त्र महानैवेद्य समर्पण. 4) श्री सप्तशती पाठ वाचन नवचुंडी शतचंडी, सहस्त्रचंडी, अयुनचंडी, लक्षचंडीपाठाचे अनुष्टाण व दशांश हवन केले जाते. 5) अर्चन :- देवीस सौभाग्यद्रव्य, फलपुष्प, नाणी, आदि द्रव्यांने सहस्त्रनामाने अर्पण केली जाते. 6) भोगी :- देवीस साडीचोळी सौभाग्य अलंकारी, सोन्याचे चांदीच्या वस्तू समर्पण करून महानैवेद्य समर्पण होतो. 7) जप :- जप, देवीसुक्त, देवीकवच, देवी स्त्रोतांचा जप करून देवीची पुजा अभिषेक नैवेद्य केला जातो. 8) दंडवत :- लोटांगण घालीत पायरया चढणे व दर्शन घेणे लहान मुलांचे जावळ काढणे ही दंडवत पुजा. 9) पारडीपुजा :- देवीची पारडी, मीठ, शिधा, धान्य खण, नारळ, यांनी भरणे. 10) गोंधळ :- आरोधी, गोंधळी यांचे कडून देवीचे गुणगाण श्रवण करणे व नैवेद्य समर्पण करणष. 11) पोत :- चिंध्यांचा मोठा काकडा तेल घालून पेटवणे व देवीची गाणे म्हणणे. 12) प्रदक्षिणा :- प्रदक्षिणा मार्गाने देवीस शक्य तेवढ्या नाम घेऊन प्रदक्षिणा करणे. 13) वस्तू समर्पण :- देवीस सौभाग्य अलंकारीक वस्तू समर्पण करणे पायरयांच्या संख्येनुसार श्रीफळ अर्पण करणे. 14) महादक्षिणा :- रोज आपल्या गल्ली देवीची दक्षिणा पेटी ठेवून वर्षभरात जमेल तेवढील दक्षिणा देवीस दानपेटीत समर्पण करणे. 15) ध्यान चिंतन :- रोज देवीची आपल्या घरी पुजा करून ध्यान करणे. 16) छबीना पालखीची :- उत्सवामध्ये देवीगडावर देवीच्या पालखक्षची मिरवणूक असते त्यावेळी सेव अर्पण करणे. 17) तांबुल :- नागवेलीच्या पानाचातांबुल देवीस अर्पण करणे. 18) प्रचार :- श्री मोहटादेवीच्या भावभक्ती उपासनेचा प्रचार करणे.

नित्य धार्मीक पुजा विधी आरती कार्यक्रम वेळापत्रक नित्य कार्यक्रम मंदीर गाभारा 1) पहाटे 4 ते 5 नगारावादन, भुपाळी 5 ते 7 महापुजा, महाभिषेक स. 7 ते 7.30 आरती, तिर्थप्रसाद वाटप स. 7.30 ते 11.30 भावीकांचे दर्शन दु. 11.30 ते 12 मध्यान्हपुजा, महानैवेद्य समर्पण 12 ते 12.30 आरती दु. 12.30 ते सायं. 6.30 भावीकांचे दर्शन सा. 6.30 ते 7 प्रदोषपुजन सा. 7 ते 7.45 आरती प्रार्थना 7.45 ते 9 भाविकांचे दर्शन

अभिषेक कक्ष स. 8 ते दु. 12 प्रतिमेस अभिषेक, अर्चन, कुलाचार, कुलधर्म श्री. सप्तशती पाठ वाचन. दु. 1 ते 4 श्री सत्यनारायण, श्री सत्याची पुजन.

धार्मिक उत्सव मासीक उत्सव - दर पौर्णिमेस महाभिषेक पुजा, रात्री, 8 ते 9 अन्नदान 9 ते 11 किर्तन, 11 ते पहाटे 4 हरीजागर.


वार्षिक उत्सव – चैत्र शु. प्रतिपदा ते रामनवमी – वा नवरात्रोत्सव श्रीराम जन्मोत्सव. श्रावण वद्य 8 श्री कृष्ण जन्मोत्सव भाद्रपद 4 ते 40 श्री गणेशोत्सव आश्विन शु. 1 ते 9 शारदीय नवरात्रोत्सव आश्विन शु. 11 प्रगट दिन आनंदोत्सव कार्तिक शु. 1 मोहटागावामध्ये चांदीच्या मुखवटा पुजन दर्शन सोहळा. 7) मार्गशिर्ष शु. 15 दत्तजन्मोत्सव 8) पौष शु. 7 ते 15 शाकंभरी नवरात्रोत्सव 9) माघ वद्य 30 महाशिवरात्र 10) फाल्गुन शु. 15 होळी पुजन 11) चैत्र शु. 15 श्री हनुमान जन्मोत्सव

शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.

आश्विन शु. 9 होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती

आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह, काकडआरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी. विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन एकादशी – प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3 आश्विन 12 नामांकित मल्लांचा चंगी हंगामा. बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा. Sandeep Ghule ( Mohata Devi Trust- Head of I.T.)