चर्चा:भिकाईजी कामा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सचिन,

माझ्याकडे जवळ जवळ २०० क्रांतीकारकांची नावे आणि माहिती आहे जी मी मराठी विकीपेडियात भरायचा विचार करतो आहे. प्रश्न एवढाच आहे की ही सारी नावे "भारतीय स्वातंत्र्य लढा" या चौकटीत / साच्यात टाकावीत का एक वेगळा साचा करून त्यात भरावीत? तुमचे काय मत आहे?..... मंदार कुलकर्णी

सहसा मार्गक्रमण साचे बनवताना व्याप्ती हा एक कळीचा मुद्दा असतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिक म्हणून उल्लेखनीय काम केलेले लोक हजारांच्या घरात / शेकड्यांच्या घरात आहेत. त्यांची नावे लिहून साचा बनवला, तर साचा लोड व्हायला बराच वेळ लागेल की काय, अशी भीती वाटते. खेरीज या साच्यात "अमुक व्यक्तीचे नाव आहे, तमुक व्यक्तीचे नाही" अश्या तर्‍हेची भांडणे मागाहून उद्भवायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा या साच्यात व्यक्तिनावांची जंत्री लिहू नये; किंवा लिहिल्यास, तिचे स्वरूप सर्वमान्य ठरू शकेल, अश्या मोजक्या व्यक्तींपुरते सीमित ठेवावे. किंबहुना भारतीय स्वातंत्र्यलढ्यासारख्या व्यापक प्रक्रियांमध्ये व्यक्तींपेक्षा घटनांना महत्त्व देऊन त्या घटनांची पाने मार्गक्रमण साच्यात टाकून हा विषय फुलवावा (याचा एक संलग्न फायदा असा, की भारतीय स्वातंत्र्यलढा या अभ्यासक्षेत्रात आणि पर्यायाने भारतीय समाजात जी व्यक्तिपूजन करायची/पुतळे उभारायची घातक परंपरा बोकाळली आहे, ती विकिपीडियावर बोकाळणार नाही.).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०२, १५ मे २०११ (UTC)
संकल्प, मला असे वाटते की विकिपीडियाचा उपयोग अनेक नियमित वाचकांबरोबरच इतिहासाचे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक करीत असतात. जर आपण शक्य तितक्या सर्व क्रांतीकारकांची माहिती येथे उपलब्ध करून दिली तर या सर्वांनाच त्याचा फायदा होईल. याचा अर्थ पुढे त्यातून व्यक्तिपूजा सुरु होईल असे मला अजिबात वाटत नाही. आता राहिला प्रश्न संख्येचा.... जर एखाद्या क्रांतीकारकाने खरोखरच कार्य केले असेल तर त्याचा सहभाग विकिपीडिया मध्ये असायला हवा. त्याला संख्येचे बंधन घालायाची गरज नाही. क्रांतीकारकांचे जास्तीचे उदात्तीकरण होत नाही आणि विकिपीडियाची भाषा सांभाळली म्हणजे झाले. या प्रयत्नाने अशा अनेक क्रांतीकारकांची माहिती आपल्याला जगाला करून देता येईल. किंबहुना त्यामुळे सध्या होत असलेल्या थोड्या नावांची व्यक्तिपूजा थांबेल.

मी अशी अनेक उदाहरणे पहिली आहेत की पालक एखाद्या व्यक्ती किंवा क्रांतीकारकांची माहिती हवी असल्यास पहिल्यांदा विकिपीडियाचा उपयोग करतात जेणेकरून त्यांना शाळेतील प्रोजेक्ट चांगला आणि वेळेत पूर्ण करता येतो! सचिन च्या मताशी मी सहमत आहे. मंदार कुलकर्णी

चर्चा म्हणजे भांडणे असा काहींचा अर्थ झालेला दिसतोय.[संपादन]

मंदारजी, विकिपीडिया म्हणजे एक ज्ञानाचा स्त्रोत असा माझ्यासारख्या सर्व सामान्यांचा विचार असतो. जसे मालदीव, इस्त्राइलला, इ. परदेशात मध्ये जसे मराठी भाषिक विकिपीडियाचा वापर करतात तसेच खेड्यातील सामान्य लोक ही वापर करतात, त्यामुळे सामान्य क्रांतिकारकांची माहिती इतरांना माहिती व्हावी त्या दृष्टीने तुम्ही मांडलेला विचार स्वागतार्ह आहे. त्याने ज्ञानाचा प्रसार होणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र साचा करावा म्हणजे इतरांबरोबर वादंग होणार नाही. हवे तर त्या साच्याला सामान्य बिगर तारांकित नाव द्यावे जेणेकरून करुन इतरांना जंत्री वाटणार नाही व घातक परंपरा वाटणार नाही. आपण प्रयत्न करायलाच हवे, मी माझ्यापरीने मदत करेन.

सचिन


भिकाजी कामा?[संपादन]

मॅडम कामा या भिकाजी कामा या नावे कधीच प्रसिद्ध नव्हत्या. हा लेख मॅडम कामा या मथळ्याखाली पुनर्निर्देशित करावा...J १५:१८, १५ मे २०११ (UTC)

  • संबधित शीर्षक साच्यातील असल्याने बदल केला नाही, हवे तर शीर्षक बदल करा. माफ करा मला त्याची पध्दती ठाऊक नाही.

Dr.sachin23 १५:४१, १५ मे २०११ (UTC)