चर्चा:भरत दौष्यंति

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऐतिहासिक/पौराणिक कालात भरत नावाचे अनेकजण आहेत. दुष्य़ंतपुत्र, दशरथपुत्र, ऋषभ राजाचा मुलगा महायोगी गुणवान राजर्षी भरत ऊर्फ जडभरत, नाट्यशास्त्र लिहिणारा भरत(मुनी), मगधराजा इद्रद्युम्नच्या दरबारातील एक ऋषी, काशीचा एक योगी(याने गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठण करून बोराची झाडे बनलेल्या दोन अप्सरांचे पुनरुत्थान केले होते), पद्मपुराणातील एक दुराचारी ब्राह्मण, भौत्यमनूचा पुत्र, करंधमपुत्र मरुत्त ऊर्फ भरत इत्यादी. याशिवाय अग्निवंशात चार-पाच भरत होऊन गेले. भरतवंश नावाचे एक पूरुवंश व कुरुवंशाच्या समकालीन घराणे होते; त्यात सुदास, दिवोदास, शतानीक इत्यादी राजे होऊन गेले. या वंशाला तृत्सू व त्यातील लोकांना भरतगण असेही म्हणत. या ऋषभपुत्र भरताच्या नावावरून भारतवर्ष हे नाव पडले, दुष्यंतपुत्राच्या नावावरून नाही. वर्ष म्हणजे वर्षाऋतून एकाच वेळी पावसाखाली असणारा प्रदेश.--J--J ०५:१३, २८ मे २००७ (UTC)


भरत निःसंदिग्धीकरण[संपादन]

भरताचे निःसंदिग्धीकरण करावे लागेल हे माहित होते म्हणून सम्राट भरत असे लिहिले आहे. बाकी, आपला मुद्दा की तो ऋषभपुत्र भरत होता तर ती जैन संकल्पना आहे. इतरत्र दुष्यंतपुत्र भरत असेच मानले जाते, तेव्हा फारतर डिस्क्लेमर टाकता येईल असे मला वाटते. आपल्याकडे असे नसल्याचा ठोस पुरावा असेल तर वाचायला आवडेल. The Vishnu Purana (2.3.1) has: uttaram yatsamudrasya himādreścaiva daksinam / varsam tadbhāratam nāma bhāratī yatra santatih

असे वाचल्याचे आठवते ते किती बरोबर?

बाकी नि:संदिग्धीकरण http://en.wikipedia.org/wiki/Bharat येथे वाचता येईल. priyambhashini ०९:४०, २८ मे २००७ (UTC)