Jump to content

चर्चा:बाबासाहेब देशमुख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गेल्या अनेक दशकांत 🚩महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात राष्ट्र शिवशाहीर,सिंहललकार बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल.

  • “🚩ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे.!

करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण , शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण! शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी…! आधी नमन साधुसंताला-ज्ञानेश्वराला- एकनाथाला-तुकाराम गाडगेबाबांच्या गुरुचरणाला जी रं जी जी… नमन माझे नामानंदाला,गुरुमाऊलीला पांडुरंगा, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला ,मुक्कामी मालेवाडीला शाहीरी साज चढविला, पूर्ण चढवुन शाहीरी साजाला शाहीर देशमुख गातो पोवाड्याला जी रं जी जी !” ही शाहीरी ताण शिवजयंतीला आजही महाराष्ट्रभर गर्जत असते.*

मर्दाचा पोवाडा मर्दानेच गायचा आणि ऐकायचा असतो अशी बाबासाहेब देशमुखांबद्दल जी ओळख सांगितली जाते ती योग्यच आहे.

  • बाबासाहेबांनी अनेक पोवाडे गायले. त्यांच्या गड आला पण सिंह गेला, शिवजन्म, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे या ऐतिहासिक पोवाड्यांसोबतच त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, राजारामबापू पाटील व इतर पोवाडे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.*
  • काळजाला भिडणारा पहाडी आवाज, नसानसांत चैतन्य निर्माण करणारी त्यांची वाणी पोवाडा ऐकणाऱ्या कुणालाही इतिहासात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या अभ्यास आणि गायनशैलीच्या जोरावर पोवाडा या काव्यप्रकाराला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा अभिमानाने मिरवला. लोकांनी त्यांना राष्ट्रशिवशाहिर अशी ओळख दिली.*

परंतु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या मृत्यूनंतर अद्यापही शासन दरबारी त्यांचा यथोचित सन्मान करायचा राहून गेला आहे.बाबासाहेबांची पहाडी आवाजातील सिंहगर्जना आजही रसिकांच्या मनावर गारुड करून आहे.

  • आपल्या पहाडी आवाजाने अवघ्या महाराष्ट्र मनावर अधिराज्य करणारे गुरुवर्य राष्ट्र🚩शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.!*
  • 🚩 शिवशाहीर राजेंद्र सानप, हुतात्मा नगरी वडूज, सातारा🙏🏻*

भक्ती - शक्ती संगम, शिवमंदिर पंढरपूर

[संपादन]

भक्ती - शक्ती संगम, शिवमंदिर पंढरपूर

 🚩गुरुवर्य स्वर्गीय राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपूर येथे भक्ती शक्ती संगम व्हावा म्हणून शिव मंदिराची स्थापना केली. पंढरपूर हे साक्षात वैकुंठ.! परंतु त्याआधीही पंढरपूर हे मोठे शिवस्थान आहे. शैव- वैष्णव पंथातील दोन्ही भक्त मंडळींसाठी वैकुंठ भूमी पंढरपूर ही पुण्यभूमी आहे. 

अण्णांनी त्यांच्या हयातीत पंढरपूर येथे शिव मंदिराची स्थापना केली.! ते आपल्या पोवाड्यातून नेहमीच शिवभक्तांना साद घालत-

  • "भू वैकुंठ भूमी वरी.!भीमेच्या तीरी,*
  • असे पंढरी! शिवमंदिर यावे बघण्यास,*
  • गुरु नामानंद आशीर्वादास ,शाहीर देशमुख गातो*
*पोवाडास जीरहा जी जी."* 

आज महाराष्ट्रातील लोकांना या शिव मंदिराचा विसर पडलेला आहे.मुख्य मंदिराचा भाग सोडल्यास इतर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. अण्णांनी मोठ्या दिमाखात बांधलेली स्वागत कमान पंढरपुरातील काही समाजकंटकांनी जमीनदोस्त केली आहे.आज अण्णांची पुण्यतिथी आहे. या निमित्त सर्व महाराष्ट्रातील गुरुबंधूना, शाहिरी रसिकांना विनम्र आवाहन आहे. आपल्या गुरूच्या या शिवमंदिराच्या जिवंत स्मारकास पुन्हा उर्जितावस्था निर्माण करावयाची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

  • शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून शिवमंदिर समोरील भूखंड पुन्हा प्राप्त करून घ्यावयाचा आहे. त्याठिकाणी शिव मंदिराचा जीर्णोद्धार करून महाराष्ट्रातील "देशमुखी शाहिरी परंपरेचे शक्तिपीठ" म्हणून या शिवमंदिरला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.!*

स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शाहिरी परंपरेत राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी अढळ स्थान निर्माण केले. बुलंद पहाडी आवाजाची सिंहललकारी, अभ्यासपूर्ण व्याख्यान रुपी पोवाड्यांची नवी परंपरा त्यांनी उदयास आणली. पोवाडा या महाराष्ट्रातील लोककलेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर पोवाड्यांची मोठी शृंखला त्यांनी निर्माण केले. त्याचबरोबर सांप्रत समाजातील घटनांवर ही बाबासाहेबांची लेखणी अधिकार वाणी गाजवू लागली. राष्ट्रपुरूषांचे पोवाडे, समाजातील भेदभाव, अन्याय,भ्रष्टाचार या विषयांवर बाबासाहेब पोवाड्यातून खरमरीत समाचार घेत. पोवाड्याच्या सादरीकरणात अप्रतिम वाद्यवृंद कलाकारांना सोबत घेऊन, आधुनिकतेचा साज देऊन पोवाड्याला रसिकमान्यता प्राप्त करून दिली. त्यामुळेच आजही कित्येक वर्षानंतर शिवशाहीर बाबासाहेबांचे पोवाडे हे महाराष्ट्रातील जनमानसावर अधिराज्य गाजवत आहेत.

  • आज पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्रातील एकत्र आलेल्या सर्व शिष्य मंडळींना राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या नावे शाहिरी प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापनेचा संकल्प सोडत आहे. आपणा सर्वाच्या सहकार्याने हे प्रतिष्ठान उभे राहून अण्णांच्या पवित्र स्मृतींची चिरंतन विचारज्योत, शाहिरी व्यासपीठ म्हणून आपणा सर्वास मार्गदर्शन करत राहील हीच अपेक्षा.!*
  • गुरुवर्य बाबासाहेब उर्फ अण्णांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!*

✍🏻🚩शिवशाहीर राजेंद्र सानप,

हुतात्मा नगरी वडूज, सातारा. राजेंद्र सानप (चर्चा) २३:०९, २१ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]