Jump to content

चर्चा:नामदेवशास्त्री सानप

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक शंका : १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा?? नेहमीच्या हेलिकॉप्टरची उंची ११ ते १५ फूट, लांबी ३६ फूट आणि रुंदी ८ फूट असते. डोक्यावर असलेल्या पात्याची फिरण्याचा व्यास सुमारे ३५ फूट धरला तरी हेलिकॉप्टरला ३६x३५= सुमारे १६०० चौरस फूट एवढी जागा पुरेशी असते. हेलिकॉप्टर फार मोठे असेल तर फारतर ३२०० चौरस फूट जागा. एक एकर=४३,५६० चौरस फूट. म्हणजे १६ एकरांत ४३५ हेलिकॉप्टरे मावतील. भगवानगडावर एवढी हेलिकॉप्टरे ठेवायची आहेत?....J (चर्चा) १७:२६, २ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

J, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ४३५ हेलिकॉप्टरे मावतील एवढी जागा असे असले तरी यात वाहनतळ ही आहे. याशिवाय ईतर सुविधा जसे महिलांसाठी धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते, वाचनालय, वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल शाळा . . बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.