चर्चा:तेरेखोल किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तेरेखोलचा किल्ला या लेखातील मजकूर[संपादन]

तेरेखोलचा किल्ला
नाव तेरेखोलचा किल्ला
उंची २४० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण गोवा
जवळचे गाव तेरेखोल, रेडी पणजी
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला.

सध्या या किल्ल्याचे रुपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागाचे अतिशय सुंदर पद्धतीने संवर्धन झाले आहे. मात्र काही भागात बरीच झाडी आणि गवत माजले आहे. तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोचता येते. गोव्यातून येताना पणजी, अरंबोळ, केरीं मार्गे तेरेखोलची खाडी फेरी बोटीतून ओलांडून यावे लागते. फेरीबोटची सुविधा दिवसभर उपलब्ध असते. अगदी चारचाकी गाडीदेखील फेरीबोटमधून अत्यल्प शुल्कात नेता येते.

किल्ल्याच्या रिसॉर्ट असलेल्या भागात सामान्य पर्यटकांना निःशुल्क फिरण्याची अनुमती आहे. आतमध्ये बांधीव तटबंदी, बुरुज आणि एक प्राचीन सुस्थितीत असलेले सेंट अँथनी चर्च आहे. बहुतांश वेळा ते बंद असते. तटबंदीवरुन तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते.