चर्चा:डेटा व फाइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेटा व फाइल

   डेटा म्हणजे अक्षरे, प्रतिमा आणि ध्वनी यांच्या सहयोगाने निर्माण झालेली प्रक्रिया न केलेली माहिती. आपण आधी पहिलेच आहे कि प्रक्रिया केली कि या डेटाला ठोस माहितीचे स्वरूप येते. डेटा इलेक्ट्रोनिक माध्यमातून साठविला कि त्याचा उपयोग सिस्टीम युनिटला थेट इनपुट देण्यासाठी होतो. फाइल हि महत्वाची माहिती साठवून ठेवण्यासाठी होतो. फाइलमध्ये प्रक्रिया केलेली माहिती साठवून ठेवली जाते. फाइलमुळे आपल्याला साठवलेली माहिती कधीही, केंव्हाही आणि कोठेही उपयोगात आणता येते. फाइलचे चार प्रकार आहेत.

१. डॉक्युमेंट फाइल

   वर्डप्रोसेसरकडून डॉक्युमेंट फाइल बनवली जाते. उदा. मेमो., टर्म पेपर आणि पत्रे.

२.वर्कशीट फाइल

   अंदाज्पारका आणि विक्रीचे आराखडे बांधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीटसद्वारे वर्कशीट फाइल बनवली जाते.

३.डेटाबेस फाइल

   तपशिलावर डेटा साठविण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे डेटाबेस तयार केला जातो. उदा. कर्मचाऱ्यांच्या डेटाबेस फाइलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या नावे, पॅन नंबर, कामाचे पद आननी इतर माहिती असते.


४.प्रेझेंटेशन फाइल

   प्रेझेंटेशन मटेरियल साठविण्यासाठी प्रेझेंटेशन ग्राफिक्स प्रोग्रामद्वारे प्रेझेंटेशन फाइल बनवली जाते. उदा. श्रोत्यांना द्यावयाचे माहितीपत्रक, वक्त्याचे भाषण आणि इलेक्ट्रॉनिक स्लाइड इ.