चर्चा:डाळिंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाळिंबाच्या खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुंगे-याच्या (शॉट होल बोरर) प्रादुर्भावामुळे मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात.

डाळिंबाच्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.

शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा द्यावा. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेवून प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओतावे.

खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

रोग विषय माहिती[संपादन]

रोगनाशक औषध माहिती Vinod Kolekar (चर्चा) १७:१३, २३ जुलै २०१६ (IST)Reply[reply]