चर्चा:जैविक वर्गीकरण
Untitled
[संपादन]अजून मराठीत शास्त्रीय पारिभाषिक शब्दांचे प्रमाणीकरण झाले नाही. ते करण्याची आवश्यकता आहे. तात्पुरते येथे रघु वीरांनी १९४८ साली सुचवलेले शब्द दिले आहेत.
- माझे मत
- कोणताही लेखक संपादक लेखनाच्या मूडमध्ये असताना लेखन थांबवू शकत नाही त्यामूळे विकिपीडियात तरी त्याने इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरून शब्द सूचवाचा साचा लावावयास हरकत नसावी, शब्दांच्या प्रमाणिकरणानंतर बॉट्स वापरून आपल्याला शब्द सहज आणि वेगाने बदलता येतील.
- दुसरी माझ्या मनात खूप इच्छा आहे की गूगलचे पैसे न लागणारे मोबाईल नंबर्सची सिक्रसी सांभाळणारे गूगल SMS चॅनल नावाची एक सूविधा आहे.
जर आपण वनस्पती , वनस्पती शास्त्र, यांची अधीक गरज पडणारे जे सर्व समाज घटक जसे की जीव शास्त्र विषयाचे शिक्षक,विद्यार्थी, शेतकी महाविद्यालयाचे सर्व पदवीधर,आयूर्वेद म्हाविद्यालयांचे पदवीधर त्या शिवाय रानवाटा सारख्या पर्यावरण विषयक संस्था करिता SMS चॅनल सुरू केला तर जेव्हा नवीन शब्द तयार करून हवे किंवा सध्या कोण कोणता शब्द वापरते आहे याचा SMS वरून लगेच अदमास मिळू शकेल.
त्या शिवाय एकदाका थोडा वापर सुरू झाला की एखादा शब्द दोन अर्थानी वापरल्यामुळे काही कन्फ्यूजन होते असे शब्द वर उल्लेखलेल्या लोकांच्यातूनच एक गट करून संगणक क्षेत्रातील शब्दांकरिता जशी FUEL अंतर्गत कार्यशाळाworkshop घेतल्या गेल्या तर शब्दांचे प्रमाणीकरन accept करून घेता येईल असे वाटते
- मला वाटते जैविक वर्गीकरण स्तरापर्यंत कदाचित मराठी माध्यमातील शाळांच्या शिक्षणात आधीच आलेले बालभारतीने रूढ केलेले शब्द जेथे उपलब्ध आहेत ते प्रमाण मानावयास हरकत नसावी.बालभारतीचा सुद्धा एक परिभाषाकोश आहे त्यांनीही ते इतर कोशातूनच घेतले असणार पण त्यांचा वापर जास्त असल्यामुळे त्यांना प्रमाण म्हणून स्विकारण्यास हरकत नसावी.
- तसेच शेतकी विद्यापिठे काही मराठी शब्द विशिष्ट शब्द योजना वापरत आहेत का ?शेती विषयक मासिके काय शब्द योजना करित आहेत किंवा नेमके काय करित आहेत याचा शोध घ्यायला हवा.
- जिथे सध्या उपलब्ध शब्दा पैकी कोणता प्रमाण मानावा असा प्रश्न असेल किंवा नवीन शब्दांची आवश्यकता किंवा इंग्रजी शब्दालाच प्रमाण मानणे असेल तर त्या बद्दल.
- आधी इंग्रजी शब्द जसाच्या तसा मराठीकरण करून घ्यावा.शक्यतर त्याची व्याख्या,उपयोजन आणि मूलतः इंग्रजीत कसा तयार झाला असेल,कोणता धातू वरून तयार झाला असेल त्यावरून मराठीत, संस्कृतात आणि हिन्दीत काही रूपे उपलब्ध आहेत काय ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली तर लोकांना कोणता शब्द वापरावा याचा निर्णय करणे कदाचित सोपे जाईल.
माहीतगार ०५:११, २५ ऑगस्ट २००९ (UTC)
प्रमाणीकरणाकरिता शब्दकौल
[संपादन]असे लिहा | असे दिसेल |
{{कौल|Y|माहीतगार}} |
|
{{कौल|N|माहीतगार|माझे स्पष्टीकरण}} |
|
इंग्रजी शब्द | बालभारती ? | कौस्तूभने आधी केलेले भाषांतर | गाडगिळ सरांनी केलेला बदल | हिन्दी विकिपीडियातील उपयोग | नवीन बदल सूचना एक | नवीन बदल सुचना दोन |
---|---|---|---|---|---|---|
row 1, cell 1 | row 1, cell 2 | row 1, cell 3 | ||||
row 2, cell 1 | row 2, cell 2 | row 2, cell 3 |
* जगत् (Kingdom), * संघ (Phylum), * उपसंघ (Subphylum), * अधिवर्ग (Superclass), * वर्ग (Class) * उपवर्ग (Subclass), * सहगण या कोहऑर्ट (Cohort), * अधिगण (Superorder), * गण (order), * उपगण (Suborder), * अधिकुल (Superfamily), * कुल (Family), * उपकुल (Subfamily), * आदिम जाति (Tribe), * वंश (Genus), * उपवंश (Subgenus), * जाति (Species) तथा उपजाति (Subspecies)