चर्चा:ग्लिरिसीडिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरीपुष्प (उंदीरमारी, गिरिपुष्प, सारया झाड) हा जलद वाढणारा ठिसूळ खोड असलेला वृक्ष असून शेतात, कुंपणाला लागून, रस्त्याच्या दुतर्फा, भात-खाचरांच्या बांधांवर, मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो. त्याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात, त्यामुळे त्यास उंदीरमारी म्हणतातत. गिरीपुष्पपासून सरपण मिळते. गिरीपुष्प असलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात नायट्रोजन स्थिर होऊन नापीक जमिनी सुधारतात.

गिरीपुष्प झुडपापासून वाढतो. योग्यरीतीने वाढ नियंत्रित केल्यास हा वृक्ष ३० ते ३५ फूट उंच होतो. खोडाचा घेर एक फुटापर्यंत होऊ शकतो. भारतात सर्वत्र या वृक्षाची वाढ होऊ शकते. हलक्या तेमध्यम स्वरूपाच्या जमिनीत तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची वाढ होते. महाराष्ट्रात त्याची सर्वत्र लागवड होऊ शकते.

गिरीपुष्प लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. छाट कलमे लावून देखील लागवड होऊ शकते. साधारणत: गरम पाण्यात बी टाकून रात्रभर तसेच ठेवून तसेच रोपण करतात. बियाणाची उगवण भरपूर प्रमाणात होते.चार-सहा महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात.