चर्चा:गर्भावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हे लेख असल्याने लेख-नावांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने लेख-नावे भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशी असावीत असे वाटते. त्यानुसार या लेखाचे नाव "गर्भावस्था" असावे असे वाटते. पण गर्भावस्थेविषयी लेख "गर्भ" या नावाने आहे आणि "गर्भावस्था" हा लेख गर्भारपणाविषयी (Pregnancy) आहे.

"गर्भावस्था" हा लेख "गर्भारपण" या नावाने आणि गर्भावस्थेविषयी "गर्भ" हा लेख "गर्भावस्था" या नावाने पुनर्निर्देशित करावा असे वाटते. आपली मते कळवावीत.

तसेच हळूहळू या सर्व लेखांचा विस्तार व विकीकरण करण्याचाही विचार आहे.

सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलले आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.

याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.

--Rajendra prabhune १२:४८, २५ सप्टेंबर २०१७ (IST)