चर्चा:गमभन टंकलेखन सुविधा
"त्रुटी" ह्या संस्कृत शब्दाचे "चिरफाड", "संशय", "आनिश्चिती", आणि "नाश" असे चार वेगवेगळे अर्थ आहेत. तेव्हा "त्रुटी"ऐवजी त्या चारांपैकी योग्य शब्द वापरला असता संदिग्धता रहाणार नाही.
---
माझ्या मते 'त्रुटी' हा शब्द येथे लेखकाने मुळ इंग्रजी shortcomings/bugs या शब्दासाठी वापरला आहे.
--परीक्षित 23:14, 13 मार्च 2006 (UTC)
काही वर्णांक
[संपादन]क्ष आणि ज्ञ हे वर्ण युनिकोड तक्त्यात वेगळे मांडले आहेत काय? असल्यास त्यांचे वर्णांक कोणी देऊ शकेल का? ९७२ आणि ९७३ हे हेक्स(hex) वर्णांक भविष्यात वापरात येतील असे माझ्या वाचनात आले आहे, सद्ध्या हे वर्णांक वापरल्यास ते या सुविधेत दिसत नाहीत. कोणी खुलास करेल काय?
असा नको!
[संपादन]हा लेख मराठीत गमभन टंकलेखन सुविधा इथे हलवू नये का? इंग्रजी शब्द पूर्णपणे हटवले जावेत ना?
गुजराथी
[संपादन]कोणी गुजराथी दालनामध्ये या सुविधेची माहिती गुजराथीत देऊ शकेल काय? मला गुजराथी वाचता येत असले तरी गुजराथी भाषेचा माझा व्याकरणाचा अभ्यास नाही. कोणी मदत केल्यास मी उपकृत होईन.
--Omkarjoshi 10:38, 2 एप्रिल 2006 (UTC)